Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई - action against those who...

ahmednagar news News: मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई – action against those who do not use masks


तीन लाख ६० हजार दंड वसूलम टा…

Updated:

MT

तीन लाख ६० हजार दंड वसूल

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्यातील मास्क न वापरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा सातशे हून अधिक व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ६० हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश मागील आठवड्यात दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे आणि वाहतुकीच्या ठिकाणांचे प्रभारी यांनी त्या ठिकाणी सुरक्षित वावर राहिल, यासाठी दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने, व्यवस्थापकाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. विवाह व अंत्यसंस्कार याठिकाणी गर्दी जमणार नाही याबाबत नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास संबंधित प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी. दारू, गुटखा, तंबाखू इत्यादींच्या विक्रीवर बंदी असल्याने त्याचे सक्तीने पालन करावे व सार्वजनिक ठिकाणी कोणीही थुंकू नये याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या अंतर्गत सातशेपेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तशी माहिती देण्यात आली.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Recent Comments