Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: मुकुंदनगरकरांना आर्थिक तंगी - mukundanagarkar financially strained

ahmednagar news News: मुकुंदनगरकरांना आर्थिक तंगी – mukundanagarkar financially strained


आणखी चार दिवसांचे आव्हान; ‘त्या’ वसाहतींत सुविधाही दुरापास्त

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘हॉट स्पॉट’ मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना आता आर्थिक तंगी जाणवू लागली आहे. जनधन खात्यात पैसे जमा झाले असले तरी ते काढण्यासाठी बाहेर जाता येत नाही व बँकाही बंद आहेत. तर, दुसरीकडे घरातील शिल्लक पैसेही संपत आल्याने अनेक चांगल्या व बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या कुटुंबांची अवस्था केविलवाणी झाली आहे. दरम्यान, मुकुंदनगरमधील गरीब लोकवस्तीच्या दर्गादायरा, संजोगनगर व बजाजनगर परिसरात अद्याप महापालिकेच्या सेवासुविधा पोहोचलेल्या नाहीत. अर्थात गोविंदपुरा वा दरबारचौकसारख्या मुख्य वस्तीच्या भागातच दूध, भाजीपाला व किराणा पोहोचवण्यात वेळ जात असल्याने गरिबांच्या वस्तीपर्यंत या सुविधा जात नसल्याचे सांगितले जाते.

‘करोना’बाधित सापडल्याने मुकुंदनगरचा परिसर ‘हॉट स्पॉट’ केला गेला आहे. पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा असलेला ‘हॉट स्पॉट’ पुढे आणखी वाढवला गेला. त्यामुळे येत्या २३ पर्यंत हा भाग सीलबंदच राहणार आहे. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव आहे. त्यामुळे महापालिकेने सेवा पथके नेमून तेथील नागरिकांना गरजेचे असलेले किराणा, भाजीपाला, दूध, औषधे व अन्य साहित्य सशुल्क देण्याची व्य़वस्था केली आहे; मात्र, मागील १० दिवसांपासून या भागातील नागरिकांना कोठेही जाता येत नसल्याने तसेच येथील बँकांच्या शाखांसह सर्वच व्यवहार बंद असल्याने पैशांची अडजण जाणवू लागली आहे. घरात असलेले पैसे संपू लागल्याने शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे उसनेपासने सुरू झाले आहे. पण त्यांच्याही समोर आर्थिक अडचणी असल्याने एकमेकांना मर्यादित मदत केली जात आहे. ‘कधी एकदा २३ तारीख उजाडते,’ अशी मानसिकता येथील लोकांची झाली आहे.

गरिबांचा भाग दुर्लक्षित

सुमारे ५० ते ६० हजार लोकवस्तीच्या मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा, संजोगनगर, बजाज कॉलनी या परिसरात गरीब कुटुंबे राहतात. हातगाडीवाले, रिक्षाचालक, चहाची टपरी चालवणारे, पानटपरी चालवणारे वा रोजंदारीवर काम करणारांची वस्ती या भागात जास्त आहे. त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहेच. पण महापालिकेद्वारे दिली जात असलेली वस्तू सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. रोज सकाळी ७ ते ११ या वेळेत मुकुंदनगरमध्ये महापालिकेद्वारे किराणा, भाजी व दूध वितरण होते. पण बडी मशीद-दरबार चौक, आयेशा मशीद चौक, फकीरवाडा, गोविंदपुरा अशा प्रमुख ठिकाणांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध वस्तू देण्यात वेळ गेल्यावर दर्गा दायरा, संजोगनगर व बजाज कॉलनी परिसरात वस्तू देण्यास वेळ राहात नाही. परिणामी या भागातील नागरिक सुविधांपासून वंचित आहे. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी काही स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने या भागातील सुमारे शंभरवर कुटुंबांना धान्याची मदत केल्याचे सांगितले जाते. पण धान्याचे पीठ करण्यासाठी गिरणी सुरू नसल्याने असलेल्या धान्याचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

कोणतीही भाजी…२० रुपये

महापालिकेने सुरुवातीला ५० रुपयांचे भाजी किट तयार केले होते. पण त्यातील भाज्यांचे कमी असलेले प्रमाण व त्यामानाने जास्त असलेली किंमत पाहून अनेकांनी ते घेतले नाही. त्यामुळे आता सुट्टी भाजी विकली जाते. पण कोथिंबिरीच्या जुडीपासून कोणतीही भाजी २० रुपयांनाच मिळते. या फिक्स रेटमुळेही नागरिक अस्वस्थ आहेत. पण त्यातल्या त्यात पाहिजे ती भाजी घेण्याची संधी तरी यातून मिळते, याचे समाधान मानले जाते.

मध्यरात्री होते औषधवाटप

मुकुंदनगरच्या रहिवाशांना रोज मध्यरात्री औषधांचे वाटप होते. दिवसभरात कोणाला कोणते औषध पाहिजे, याची माहिती संकलित केल्यानंतर सायंकाळी नगरमधून ती औषधे संबंधितांच्या नावांसह पॅकबंद करून आणली जातात व रात्री उशिरा संबंधितांच्या घरी पोहोच केली जातात.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

नगरमध्ये वेगळंच राजकारण! विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी भाजप नेत्याच्या मुलाची मोर्चेबांधणी – former mp dilip gandhi’s son bats for shiv sena leader candidate

हायलाइट्स:अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत वेगळंच राजकारणभाजपच्या माजी खासदाराच्या मुलाची शिवसेनेच्या दिवंगत नेत्याच्या मुलासाठी मोर्चेबांधणीश्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यानं होतेय पोटनिवडणूकअहमदनगर: नगरमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक...

Coronavirus In India: Coronavirus : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण – covid 19 cases update in india 16838 new...

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले२४ तासांत ११३ नागरिकांनी गमावला जीवएकाच दिवशी देशभरात १३ लाख ८८ हजार...

taapsee pannu and anurag kashyap news: ‘कलाकारांची चौकशी करण्याचा अधिकार, पण…’ – sanjay raut on income tax raids on taapsee pannu and anurag kashyap

हायलाइट्स:शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणातापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या चौकशीवरुन राऊतांची टीकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहेमुंबईः...

Recent Comments