Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: लॉकडाउन काळात अतिक्रमणे हटवा - delete encroachments during lockdown

ahmednagar news News: लॉकडाउन काळात अतिक्रमणे हटवा – delete encroachments during lockdown


‘जागरूक’ची मागणी; वीज दुरुस्तीही मार्गी लावण्याची गरज व्यक्त

म. टा. प्रतिनिधी,नगर

करोनामुळे सध्या शहरात लॉकडाउन असल्याने या काळात महापालिकेने शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घ्यावी. महावितरणने भूमिगत रस्त्यांतील वीजतारांचे जाळे हटवण्याची मागणी येथील जागरूक नागरिक मंचाने केली आहे.

जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे मनपा व महावितरणची प्रलंबित कामे लॉकडाउनच्या राहिलेल्या ८-१० दिवसात करण्याचे सुचवले आहे. या पत्राची प्रत मुळे यांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवली आहे.

शहरातील रस्ते, गल्ली-बोळा पूर्ण रिकाम्या असल्यामुळे जी दुरुस्तीची कामे गजबजलेल्या रस्ते वाहतुकीच्या अवस्थेत करता येत नाहीत, त्या कामांना यादरम्यान गती देऊन मार्गी लावली तर लॉकडाउनचा सदुपयोग होईल व फक्त निवडक कर्मचाऱ्यांना योग्य नियम पाळून त्यांच्या ड्युटीकाळाचा उपयोग करता येईल, असे सांगून मुळे यांनी म्हटले आहे की, सध्या पाच-दहा टक्के कर्मचारी हजर राहून उर्वरित कर्मचाऱ्यांना घरी बसूनच पगार दिला जातो आहे, परंतु जर या काळाचे योग्य नियोजन केले तर थोड्या वेळामध्ये व कमी मॅनपॉवरमध्ये शहराच्या विकासात नेहमी अडचणीच्या असणाऱ्या गोष्टी दूर केल्या जाऊ शकतात. रस्ता रुंदीकरण व अतिक्रमणाचे अनेक सर्व्हे झाले असून, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्नही झाले. पण दिल्ली गेट वेस परिसर तसेच कापड बाजार, घासगल्ली, मोचीगल्ली व चौपाटी कारंजा अतिक्रमणमुक्त झालेले नाहीत. त्याचप्रमाणे जिथे चौक आहे, त्याठिकाणी बरोबर वळणावर दुकानदारांनी बेकायदेशीररित्या बाहेर काढलेले ओटेदेखील विनासायास फक्त एक पोलिस, एक जेसीबी व १-२ कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाडून रस्ते मोकळे करता येतील. पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या गटारी, शहरातील अदृश्य झालेले ओढे व बुजलेल्या गटारी मोकळ्या करता येतील. सीनानदीचा किनारा स्वच्छता व सुशोभीकरणही मार्गी लागू शकेल, असे त्यांनी यात सुचवले आहे.

महावितरणच्याही समस्या

भर रस्त्यामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे इलेक्ट्रीकचे खांब गंज बाजार, सांगळेगल्ली, नालेगाव, माळीवाडा व महाप्रभुजी मार्ग अशा अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे आहेत, तसेच अनेक ठिकाणी खांबांवर विद्युत मंडळाच्या वीज तारांचा गुंतादेखील आहे. तो आताच्या काळात व्यवस्थित, सुरक्षित व नीटनेटका करता येऊ शकतो. अडथळ्याचे खांब हलवले गेल्यास व भूमिगत वीजवाहिनीचे कामही याच काळात करून घेतल्यास पावसाळ्यात पावसाचा एकच थेंब पडल्यानंतर लाईट जाण्याची महावितरणची परंपरा यंदा खंडीत होऊ शकते, असे उपरोधिक भाष्यही या पत्रात करण्यात आले आहे.

बकेट लिस्ट उघडा

लॉकडाउनचा सदुपयोग करण्यासाठी महापालिका व अन्य शासकीय संस्थांनी आपल्या कार्यालयाद्वारे प्रलंबित असलेल्या कामांची बकेट लिस्ट उघडावी व ती कामे मार्गी लावण्याची गरजही मुळे यांनी व्यक्त केली आहे. समवेत त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले कापड बाजार, घासगल्ली, मोची गल्ली, चितळे रोड, दिल्ली गेट या समस्याग्रस्त वाहतूक रस्त्यांचे लॉकडाउन काळातील फोटोही दिले आहेत.

फायलींचे रेकॉर्ड नोंदवा

मनपामधे कमीतकमी ५० ते ७५ हजार जुन्या फायलींनी रेकॉर्ड रुमचे दोन हॉल तुडूंब भरले आहेत, त्यातील आवश्यक माहितीचे संगणकीकरण करण्याचे काम होऊ शकते. लॉकडाउनच्या काळात निष्क्रिय बसलेल्या पगारी कर्मचाऱ्यांकडून असे विधायक काम करण्याचे नियोजन व आदेश मनपा आयुक्तांनी दिल्यास नगरकर नागरिक निश्चितच त्यांचे आभारी राहतील व आपण भरत असलेले कर सत्कारणी लागत असल्याचे समाधान त्यांना लाभेल, असेही भाष्य मुळेंनी यात केले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad director general of police: Hyderabad : नेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा – hyderabad civic body election police chief warns against controversial...

हैदराबाद : हैदराबाद महानगर पालिका निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

nokia 2.4: Nokia 2.4 भारतात लाँच, २ वर्षांपर्यंत मिळणार अँड्रॉयड अपग्रेड, जाणून घ्या किंमत – nokia 2.4 with dual rear cameras, 4,500mah battery launched...

नवी दिल्लीः HMD Global ने भारतात Nokia 2.4 लाँच केला आहे. या फोनचा एकच व्हेरियंट आणला गेला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस...

Recent Comments