Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: शिवभोजन केंद्रासमोर रांग - queue in front of shiv...

ahmednagar news News: शिवभोजन केंद्रासमोर रांग – queue in front of shiv bhoj kendra


सोशल डिस्टन्स पाळण्याकडे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नगर

लॉकडाउन काळात गरजू व गरीब लोकांचे जेवणाचे हाल होऊ नयेत, यासाठी शिवभोजन केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. या केंद्रांचा चांगला फायदा गरजू लोकांना होत आहे. या केंद्रांसमोर रांगा दिसत आहेत. मात्र, केंद्राच्या बाहेर सोशल डिस्टन्स पाळावे, यासाठी वारंवार सूचना देण्यात येत असल्यातरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असताना सुरुवातीला शिवभोजन केंद्र बंद ठेवण्यात आली होती. मात्र, गरजू व गरीब लोकांना जेवण मिळावे, यासाठी लॉकडाउनच्या काळात ही केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये येणाऱ्या लोकांनी एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवावे, असे निर्देशही सातत्याने देण्यात येत आहेत; तसेच मास्कचा वापर करावा, असेही सांगण्यात येत आहे. सोशल डिस्टन्स राहावा, यासाठी सुरुवातील केंद्रचालकांनी व्यवस्थाही केली. मात्र, आता केंद्राच्या बाहेर लांबचलांब रांगा दिसत असून ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सचा अभाव दिसून येत आहे. वारंवार सूचना देऊनही सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या बाहेर दोन नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स राहावा, यासाठी उपाययोजना करण्यासोबतच नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आव्हान केंद्र चालकांपुढे असणार आहे.

ओळी

शहरातील शिवभोजन केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागत असून सोशल डिस्टन्सकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचं जावडेकरांना महत्त्वाचं पत्र; केली ‘ही’ विनंती – mangrove conservation aditya thackerays letter to prakash javadekar

मुंबई: राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास वा सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे...

तंबाखूजन्य पदार्थांचे नाशिकरोडला घबाड – police seize banned tobacco items worth rs 11 lakhs

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोडनाशिकमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा चोरटा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकरोड येथे अन्न व औषध प्रशासनाने...

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

Recent Comments