Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: 'हॅलो चंद्रशेखरजी, गाव में कैसा चल रहा हैं' -...

ahmednagar news News: ‘हॅलो चंद्रशेखरजी, गाव में कैसा चल रहा हैं’ – ‘hello chandrasekharji, how are you doing in the village’


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चंद्रशेखर कदम यांना फोनम टा…

Updated:

MT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चंद्रशेखर कदम यांना फोनम . टा. वृत्तसेवा, राहुरीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता राहुरी तालुक्याचे माजी आमदार व शिर्डी देवस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांना फोन करून ‘करोना’च्या प्रादुर्भावाचा आढावा घेत माहिती घेतली. कोणत्या व कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या याबाबत सखोल चौकशी केली.राहुरी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी स्वत:हून फोन करून संवाद साधण्याची घटना घडली. अचानक आलेल्या या फोनमुळे कदम भारावून गेले होते. कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आहेत. पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याने कदम यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ‘हॅलो चंद्रशेखरजी, गाव में कैसा चल रहा हैं…’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी विचारणा करीत संवादाला सुरूवात केली. मोदी यांचा आवाज कानी पडताच कदम यांचा उत्साह द्विगुणित झाला. अवघ्या दोन मिनिटांच्या संभाषणात कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना राहुरी तालुक्याचा व देवळाली प्रवरा शहराची माहिती संगितली. देवळाली प्रवरा सारख्या ग्रामीण भागाची विचारपूस केल्याबद्दल कदम यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. करोनाविरुद्ध संघर्षासाठी कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रशेखर कदम हे देवळाली प्रवरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून परिचीत आहेत.शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी नऊ वाजता कदम यांचा भ्रमणध्वनी खणखणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याशी बोलणार आहेत, असे सांगत स्वीय सहायकाने पंतप्रधानांना फोन दिला. त्या नंतर मोदींनी ‘हॅलो, चंद्रशेखरजी बात कर रहे है?’ अशी विचारणा करीत चंद्रशेखरजी तुम्ही गावीच असता का? अशी विचारणा त्यांनी केली. यावर कदम यांनी ‘देवळाली प्रवरा हे माझे गाव असून मी तेथेच राहतो,’ असे सांगितले. यावर मोदींनी ‘राहुरी तालुक्यात करोनाची स्थिती कशी आहे,’ अशी विचारणा केली. कदम यांनी, ‘आमच्या सुदैवाने राहुरी तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. देवळाली प्रवरा गावच्या सर्व सीमा, रस्ते बंद केले आहेत. आपले कार्यकर्ते रस्त्यांवर रात्रंदिवस गस्त घालत आहेत. बाहेरचा एकही माणूस आमच्या गावात येऊ देत नाही. देवळाली गावात आम्ही अन्नछत्र सुरू केले आहे. स्वयंसेवकांद्वारे रोज दुपारी व रात्री अन्नाची दीड हजार पाकिटे गरिबांना वाटली जातात,’ असे सांगितले. यावर पंतप्रधानांनी, ‘चंद्रशेखरजी, ऐसे ही डटे रहो. करोना के खिलाफ संघर्ष में आपका योगदान बहुमोल होगा,’ अशा शब्दात कौतुक केले. यानंतर कदम यांनी, ‘मोदीजी करोनाविरूद्ध आपला मोठा संघर्ष सुरू आहे. खूप चांगले काम करीत आहात. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत,’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. ‘तुमच्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत,’ असे सांगत पंतप्रधानांनी संभाषणाचा शेवट केला. अवघ्या दोन मिनिटांच्या या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत स्वयंसेवकाच्या कामाचा, त्यांच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी साधलेल्या संवादामुळे स्वयंसेवकांच्या कामाला बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे. मोदी यांचा कदम यांना फोन आल्याची वार्ता तालुक्यात पसरल्यानंतर अनेकांनी कदम यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Anil Parab: ‘सुपारी घेतल्याशिवाय मनसे हा पक्ष कामच करू शकत नाही’ – shivsena leader and maharashtra minister anil parab attacks on mns party over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई'मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू...

Recent Comments