Home आपलं जग करियर AICTE: UPSC, बँकिंग परीक्षांसाठी AICTE चे फ्री कोर्सेस - aicte launched 49...

AICTE: UPSC, बँकिंग परीक्षांसाठी AICTE चे फ्री कोर्सेस – aicte launched 49 learning courses for upsc other exam preparation


अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने ४९ फ्री ऑनलाइन कोर्सेस लाँच केले आहेत. यापैकी एनेक कोर्स कम्युनिकेशन्स स्कील्स विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतील. यूपीएससी, बँकिंग आणि अन्य परीक्षांच्या अंतिम टप्प्यातील मुलाखतींच्या तयारीसाठी या कोर्सेसची मदत होणार आहे. विद्यार्थी या मोफत ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून आपलं संवाद कौशल्य वाढवू शकतील आणि कोणतीही परीक्षा किंवा जॉब इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होऊ शकतील.

विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी तयार व्हावं, त्यासाठी त्यांनी अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करावी, हा या अभ्यासक्रमांमागील AICTE चा उद्देश आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची इंग्रजीतून संवादातील क्षमतेतही सुधारणा घडवून आणतात. इतकंच नव्हे तर ये फ्री कोर्स विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास दुणावायलाही मदत करतात. मुलाखतीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास या अभ्यासक्रमांमुळे मिळतो. या कोर्सेसमध्ये ५० तासांचं चॅट आधारित इंटरअॅक्टिव्ह ऑडिओ व्हिज्युअल मटेरिअल आहे.

इंट्रोडक्शन टू बँकिंग आणि यूपीएससीचा परिचय असे कोर्सही स्टडी मटेरिअलसह तयार केले गेले आहेत. बँकिंग आणी यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या अभ्यासक्रमांचा नक्कीच फायदा होईल. एआयसीटीईने म्हटलंय की ‘या अभ्यासक्रमांमधून तुम्हाला नागरी सेवा परीक्षांसाठी आवश्यक सर्व एनसीईआरटी पुस्तकांमधील बेसिक अभ्यासाची माहिती मिळणार आहे आणि नेमकी तयारी कशी, कुठून करायची याचीही माहिती मिळणार आहे.’

गेट परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाच्या मदतीने परीक्षेची तयारी करू शकतात. या कोर्समध्ये इंजिनीअरिंगच्या प्रत्येक शाखेच्या सर्व मुख्य विषयांवर १०० तासांहून अधिक कालावधीचे व्हिडिओ आहेत.

विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ उठवण्यासाठी १५ मेपर्यंत नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

AICTE Free CoursesSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rto office aurangabad: ऑनलाइन अपॉइंटनेंट अचानक ऑफलाइन – few vehicle owners complaint against rto office to transport commissioner in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादआरटीओ कार्यालयात वाहनाचे फिटनेस घेण्यासाठी वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, बॅकलॉगच्या नावाखाली या वाहनांच्या फिटनेसचे दिनांक बदलून, त्यांना ऑफलाइन...

jayant patil on devendra fadanvis: अर्थसंकल्पावर फडणवीसांची टीका; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर – jayant patil on devendra fadanvis over maharashtra budget

हायलाइट्स:अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केलाअर्थसंकल्पावरुन देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्रफडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तरमुंबईः आज विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला....

PM Modi: womens day pm modi : महिला दिनाला PM मोदींची जोरदार ऑनलाइन खरेदी, निवडणुका होत असलेल्या राज्यांतून घेतल्या वस्तू – womens day pm...

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( womens day ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( pm modi ) 'नारी शक्ती'ला सॅल्यूट केला आहे. भारताला स्वावलंबी...

Recent Comments