Home क्रीडा Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेने केले ठाकरे सरकारचे कौतुक; म्हणाला... - cricketer ajinkya...

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेने केले ठाकरे सरकारचे कौतुक; म्हणाला… – cricketer ajinkya rahane says thank you to thackeray government


मुंबई: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयावर रहाणे यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या माध्यमातून त्याने राज्य ठाकरे सरकारचे कौतुक केलय आणि आभार देखील मानले आहेत.

वाचा- IPLबाबत नवी अपडेट; बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे. या सप्ताहात शेतकऱ्यांना आधिनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. त्याच बरोबर त्याविषयी जगृती केली जाणार आहे. हा सप्ताह एक ते सात जुलै या काळात साजरा केला जात आहे.

वाचा- द्रविडच्या चार शतकानंतर ‘त्या’ विक्रमाच्या जवळ कोणी पोहोचू शकलं नाही!

कृषी संजीवनी सप्ताह संदर्भात रहाणे याने ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, मी आशा करतो की तुम्ही सर्व जण सुरक्षित असाल आणि योग्य ती काळजी घेत असाल. मी स्वत: एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकरी शेतात किती मेहनत घेतो याची मला जाणीव आहे. शेतकऱ्याबद्दल खुप आदर आणि प्रेम आहे. सध्या करोना व्हायरसच्या संकटात देखील शेतकरी रात्रंदिवस परिश्रम घेत असल्यामुळे आपल्याला अन्न मिळत आहे. येणारा आठवडा १ ते ७ जुलै हा आठवडा कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, कृषी विषयक उपक्रमाबद्दल त्यांना माहिती दिली जाईल. तसेच आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा प्रगतीचा मार्ग नक्की सोपा होईल. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या या उपक्रमासाठी मी त्यांचे आभार मानतो.

वाचा- सर, तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते; सचिन झाला भावूक!

अजिंक्य रहाणेचा हा व्हिडिओ कृषी मंत्री दादीजी भुसे यांनी शेअर केला आहे.

हे देखील वाचा-
शशांक मनोहर यांनी ICCच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा!
जेव्हा रोहितने बांगलादेशला पळवून पळवून मारले; पाहाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'रिपब्लिक टीव्ही'विरुद्ध हंसा ग्रुपचा नवा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'टीआरपी घोटाळा प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या () दक्षता पथकासोबत काम करून आम्ही अंतर्गत अहवाल तयार करून त्याआधारे मुंबई...

corona free gram panchayat in thane: करोना वेशीबाहेर – 45 gram panchayat of thane district not found single corona positive patient

म. टा. वृत्तसेवा, ठाणेदेशभरात सर्वत्र करोनाच्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण असताना ठाण्यातील ४५ ग्रामपंचायमतींमध्ये आत्तापर्यंत एकही करोनारुग्ण आढळलेला नाही. नियमांचे काटेकोर पालन करत वेगवेगळ्या...

gold price today: Gold Rate Today सोने तेजीत ; सलग दुसऱ्या सत्रात सोने दरात वाढ – gold price surge second consecutive day

मुंबई : कमॉडिटी बाजारात बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सोने ३१० रुपयांनी महागले. सोन्याचा...

Recent Comments