Home शहरं सातारा ajit pawar: Ajit Pawar अजित पवार संतापले; काढली गोपीचंद पडळकरांची लायकी -...

ajit pawar: Ajit Pawar अजित पवार संतापले; काढली गोपीचंद पडळकरांची लायकी – deputy cm ajit pawar slams bjp mla gopichand padalkar


सातारा:राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची करोनाशी तुलना करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला. ‘आपली योग्यता काय, आपण बोलतो काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, याचं तरी भान ठेवा, असे सुनावतानाच सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी आपल्याच तोंडावर उडते हे लक्षात ठेवा, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. ( Ajit Pawar slams Gopichand Padalkar )

वाचा: ‘त्या’ विषयावर शरद पवारच बोलतात; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजितदादांचं मौन

साताऱ्यात आज अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया जाणून घेतली असता अजित पवार यांनी पडळकर यांना खडेबोल सुनावले. लायकी नसलेल्या लोकांनी पवारांविषयी बोलणे योग्य नाही. आपली पात्रता पाहून त्याप्रमाणे प्रत्येकाने व्यक्त व्हावं, असे सुनावताना केवळ आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा त्यांचा खटाटोप आहे, अशी तोफ अजित पवार यांनी डागली. बारामतीत पडळकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. तिथे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचे हा सारे परिणाम आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी भाजपचा उल्लेख न करता लगावला.

काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी मठ्या लोकांवर टीका करत असतात. पडळकरांनीही तेच केले आहे. आता त्यांच्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. कायदा आपला काम करेल, असे नमूद करत अजित पवार यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले.

वाचा: फडणवीस; पडळकरांची शरद पवारांनी उडवली खिल्ली

गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या अफाट क्षमतेचा गौरव केला. शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असलं तरी ते स्वस्थ बसत नाहीत. सतत कार्यरत असतात. या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. शरद पवार यांचा शब्द तेही नेहमी मानतात, असे अजित पवार म्हणाले.

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आज आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांनी उडवली खिल्ली

एकीकडे अजित पवार यांनी पडळकरांचा खरपूस समाचार घेतला असताना शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत पडळकरांची खिल्ली उडवली. ‘पडळकरांना कशाला उत्तर द्यावं. त्यांना महत्त्व देऊन नोंद असे घ्यावी वाटत नाही. बारामतीत विधानसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. परवा लोकसभेला सांगलीला की कुठे उभे होते. तिथेही डिपॉझिट जप्त झालं. त्याआधीही त्यांचं लोकसभेला त्यांचा पराभव झाला. लोकांनी एकदम बाजूला केलेल्या अशा माणसांची नोंद का घ्यायची? असा सवाल पवारांनी केला.

वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला ‘ही’ शंकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Mumbai High Court Rejects Plea Of CBI Probe Into Disha Salian’s Death – दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा...

Recent Comments