Home शहरं सातारा ajit pawar: ajit pawar: 'त्या' विषयावर शरद पवारच बोलतात; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजितदादांचं...

ajit pawar: ajit pawar: ‘त्या’ विषयावर शरद पवारच बोलतात; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजितदादांचं मौन – no comments on devendra fadnavis statement, says ncp leader ajit pawar


सातारा: सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीने दिलेल्या ऑफरबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर भाष्य करण्यास राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळले. त्या विषयावर शरद पवारच बोलतात. नो कमेंट्स असं म्हणत अजितदादांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं. विशेष म्हणजे पवारांनाही आजच माध्यमांनी याबाबत छेडलं असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. या दोन्ही नेत्यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून न लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. आज दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर, त्या ऑफरवर मला काहीच बोलायचं नाही. नो कमेंट्स. यावर काहीही बोलायचा माझा अधिकार नाही. या विषयावर शरद पवार बोलतात, असं सांगत या विषयाला अजितदादांनी पूर्णविराम दिला.

पडळकर डिपॉझिट जप्त झालेले नेते, तर फडणवीसांना प्रसिद्धीचा सोस: पवार

त्याआधी आज सकाळी शरद पवार यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यांनाही माध्यमांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटाविषयी विचारलं. तेव्हा हे आरोप फेटाळून लावण्याऐवजी फडणवीसांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे प्रसिद्धीत राहण्यासाठी ते असं बोलत असतात, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपला सत्ता स्थापनेची ऑफर आली होती का? असा सवाल केला जात आहे.

दलित कार्यकर्ते आक्रमक; गृहमंत्री देशमुखांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

फडणवीस काय म्हणाले होते…

शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, असे स्पष्ट झाल्यावर आम्ही पर्यायांची चाचपणी सुरू केली. ही चाचपणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने समोरूनच आम्हाला विचारणा केली. राष्ट्रवादीची ही ऑफर म्हणजे केवळ अजित पवारांची नव्हती तर पक्षप्रमुख त्यात होते. त्याअनुषंगाने चर्चाही सुरू झाली. त्यात एका बैठकीला मी होतो तर एका बैठकीला मी नव्हतो. ही सगळी चर्चा मला माहीत होती, मात्र नंतर अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी भूमिका बदलली आणि आम्हाला कॉर्नर केले गेले. मग मध्ये दोन-तीन दिवस गेले. काहीच हालचाली झाल्या नाहीत आणि अचानक अजित पवारांकडून आमच्यापुढे प्रस्ताव आला. ‘तीन पक्षांचं सरकार बनवणं मला मान्य नाही. भाजप व राष्ट्रवादीच राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात. आपल्याकडे स्ट्रेंथही आहे. माझी सरकार बनवायला काहीच हरकत नाही’, असा शरद पवारांचा निरोप होता, असा गौप्यस्फोटच फडणवीस यांनी केला होता.

चीनने तेव्हाही भारताचा भूभाग बळकावला होता; पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याविरोधात गेला नसता तर आमचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं’ असा दावा करत गनिमी काव्याने कसे सरकार स्थापन केले होते, त्याचा उहापोहही फडणवीस यांनी या मुलाखतीत केला. तुम्हाला फसवलं जातं, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा तुम्हाला जशास तसं उत्तर द्यावंच लागतं. त्यामुळेच गनिमी कावा खेळावा लागला. त्यातूनच रात्री सरकार स्थापन करायचं ठरलं आणि सकाळीच ठरल्याप्रमाणे सारं घडवूनही आणलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सारे चित्र पालटले. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपला निर्णय तेव्हा चुकला असे नक्की वाटते पण तेव्हा दुसरा पर्यायही नव्हता, असेही फडणवीस यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments