Home देश akhilesh yadav criticizes up govt: ... म्हणून यूपी सरकारने करोना आयसोलेशन वॉर्डात...

akhilesh yadav criticizes up govt: … म्हणून यूपी सरकारने करोना आयसोलेशन वॉर्डात मोबाइलवर बंदी घातली: अखिलेश – sp leader akhilesh yadav says that up government banned mobile phones inside covid 19 hospitals isolation wards to hide their poor condition


लखनऊ: उत्तर प्रदेशातील कोरोना रूग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाइल नेण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मोबाइलवरील बंदीवर मात्र समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टीकेची झोड उठवली आहे. गरज ही मोबाइलवर बंदी घालण्याची नसून निर्जंतुकीकरण करण्याची आहे असा सल्ला यादव यांनी सरकारला दिला आहे.

करोनाचा संसर्ग जर मोबाइलमधून पसरत असेल, तर संपूर्ण देशात आयसोलेशन वॉर्डद्वारे बंदी घालायला हवी, असेही यादव यांनी म्हटले आहे. मोबाइलमुळे मानसिक आधार मिळतो. वास्तविक, रुग्णालयांमधील गैरकारभाराची व दुर्दशेची सत्यता लोकांपर्यंत पोहोचू नये, म्हणून ही बंदी आहे, असा आरोप करताना गरज मोबाइलवर बंदी घालण्याची नसून स्वच्छता पूर्ण करण्याची आहे, असे ते म्हणाले.

अखिलेश यादव यांनीही योगी सरकारवर योग्य नियोजन केले नसल्याचाही आरोप केला आहे. दुसर्‍या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ‘कोरोनातील सरकारी गैरकारभारामुळे ही गोष्ट हवाई चप्पल वापरणाऱ्यांपेक्षा रस्त्यांवर अनवाणी जाणास भाग पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. ज्या लोकांकडून जनतेला सहानुभूतीची अपेक्षा होती तेच लोक त्यांच्या दु:खाचे कारण बनत आहेत. सरकार सर्वांसाठी आहे, ही पोकळ घोषणा नव्हे घोषवाक्य नसावे तर ठराव ठरु नये.
आयसोलेशन वॉर्डात का आहे मोबाइलवर बंदी?

कोविड-१९ ला वाहिलेल्या एल -२ आणि एल-३ रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना वेगळ्या वॉर्डात मोबाइल फोन जवळ बाळगण्याची परवानगी नाही, कारण यामुळे संसर्ग पसरतो, उत्तर प्रदेशचे आरोग्य महासंचालक के.के. गुप्ता यांनी जारी केलेल्या आदेशात असे सांगितले गेले आहे.

वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या महासंचालकांनी काढलेल्या आदेशानंतर राज्यातील कोविड -१९ रुग्णालयांमध्ये रूग्णांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मोबाइलमुळे कोरोना संसर्ग पसरतो, असा महासंचालकांचा दावा आहे. कोरोना वॉर्डमधील नवीन नियमांनुसार, रुग्णालयाच्या प्रभारीजवळ २ मोबाइल फोन असतील. याच प्रभारींच्या माध्यमातून रूग्णांना त्यांच्या कुटूंबियांशी बोलू देण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६,०१७ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ३,४०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १५५ रुग्ण मरण पावले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

जीएसटीचा नियमसंभ्रम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीसंबंधी केंद्राने एखादे परिपत्रक काढले, तरी राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा अभ्यास करून त्यातील नियम बदलले...

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

bharat jadhav post for father: खूप रडलो होतो त्या दिवशी… अभिनेते भरत जाधव यांची भावुक पोस्ट – marathi actor bharat jadhav shares emotional post...

मुंबई: मराठी सिने-नाट्य सृष्टीत पहिली व्हॅनिटी घेणारा कलावंत म्हणून मान मिळविलेले अभिनेता भरत जाधव यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांसाठी एक भावुक अशी पोस्ट शेअर...

Recent Comments