Home देश Aksai Chin: अक्साई चीन लडाखचा भाग, भारताने सीमेवर आक्रमक व्हावंः राम माधव...

Aksai Chin: अक्साई चीन लडाखचा भाग, भारताने सीमेवर आक्रमक व्हावंः राम माधव – ladakh includes aksai chin says ram madhav


नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) चीनशी तणाव सुरू असताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तान सीमेवर जी आक्रमकता दाखवली जाते तशीच आक्रमकता भारताने चीन सीमेवरही दाखवावी, असं राम माधव यांनी म्हटलंय. आपला आत्मसन्मान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी भारताने हे पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं राम माधव यांनी म्हटलंय.

चीनशी सुरू असलेल्या सीमावादावर एकच उत्तर आहे ते म्हणजे चीनशी कूटनिती आणि सैन्य अशा दोन्ही आघाड्यांवर सक्रियता दाखवली पाहिजे. आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायजरद्वारे भारत-चीन सीमा मुद्द्यावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अक्साई चीन लडाखचा भाग

भारताचा दावा हा फक्त एलएसीपर्यंत मर्यादित नाहीए. तर भारताचा दावा त्याही पलिकडे आहे. तसंच पाकव्याप्त काश्मीरही जम्मू-काश्मीरचा भाग आहे. लडाख हा भारताचा भाग आहे. लडाखमध्ये गिलगिट बाल्टिस्तान आणि अक्साई चीनचाही समावेश आहे, असं राम माधव म्हणाले. परराष्ट्र संबंधांच्या विषयावर माधव हे भाजपचा चेहरा मानले जातात.

भारताला-चीनसोबत युद्ध नको आहे. पण एलएसीवर आत्मसन्मान राखण्यासाठी भारताला आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. भारताला आपल्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण करायला हवे, असं राम माधव यांनी सांगितलं.

गलवानमधून चिनी सैनिकांना मागे ढकलले, उपग्रह फोटोंमधून समोर

चीन सध्या अधिक आक्रमक

चीन सध्या अधिक आक्रमक आहे. चीनच्या या आक्रमकतेचं कारण म्हणजे भारताचे ठोस धोरण. चीनला सीमावाद कधीच सोडवायचा नाहीए. यामुळेच पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात झालेल्या एका द्वीपक्षीय करारात एग्झिस्टिंग शब्द जोडण्यास नकार दिला.

‘त्यावेळी चीनला आसाम द्यायला निघाले होते पंडित नेहरू’

चीनच्या आक्रमकतेला आधीची सरकारं जबाबदार आहेत. आपल्या शांतता हवी आहे. त्यासाठी भारताने सतत प्रयत्न केले. १९८८ मध्ये राजीव गांधी असो, १९९३ मध्ये नरसिंह राव असो की देवेगौडा या सर्व सरकारांनी चीनसोबत शांतता राखण्याचा प्रयत्न केला. पण चीनने सर्वांना धोका दिला, असं राम माधव म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: kangana ranaut : शिवसेना नेत्यांकडून जिवाला धोका, कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव – kangana ranaut in supreme court seeking transfer criminal cases

नवी दिल्लीः मुंबईत दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत ( kangana ranaut ) आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आता सुप्रीम कोर्टात...

nashik onion growers: कुठे घसरला, तर कुठे वधारला – onion price decline in pimpalgaon, lasalgaon and onlion price increased in manmad and nandgaon

टीम मटागेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांदादराबाबत चढउतार अनुभवास येत आहेत. सोमवारी पिंपळगाव, लासलगावात कांदादरात ३०० रुपयांची घसरण झाली तर, येवला मनमाड, नांदगावात मात्र...

शेकडो संस्था सभासदत्वाविना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या पंचवीस वर्षांपासून आलटून पालटून काही अंशी बिनविरोध करून तेच तेच संचालक आजपर्यंत कायम असून,...

Recent Comments