याबाबत रेणुका यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘आपल्या इंडस्ट्रीतील एका देवदूताने नुपूरला मदत केली. यामुळे नुपूर यांच्या आईला चांगले उपचार मिळणं आता शक्य होणार आहे. माझी फेसबुक पोस्ट वाचत मदतीसाठी धावून आला तो म्हणजे अक्षयकुमार. अक्षयकुमारने आशुतोष राणा यांना दूरध्वनी करून आवश्यक ती माहिती घेतली आणि काम होऊन जाईल असं सांगितलं. त्यानुसार तसं केलंही. या दयाळू कलाकाराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी आशा करते की तुला आणि संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक आनंद आणि यश मिळो. खरोखर मनापासून आभार.’
गेल्यावर्षी बँकेत अडकला पैसा
नूपुरने आतापर्यंत ‘स्वरागिनी’, ‘तंत्र’, ‘इस प्यार को क्या नाम दूं एक बार फिर’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. गेल्यावर्षी एका बँकेच्या घोटाळ्यात तिचे जमा केलेले पैसे बुडाले. तेव्हापासून ती आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.
सहकाऱ्यांकडून उधार घेतले पैसे
नूपुरने रेणुकाच्या मदतीसाठी तिचे आभार मानले. याशिवाय खर्च चालवण्यासाठी तिने सहकाऱ्यांकडून पैसे उधार घेतले होते आणि आपले दागिनेही विकले होते. जेव्हापासून तिचं अकाउंट बंद झालं आहे तेव्हापासून तिच्यावर आर्थिक संकट आलेलं आहे.