– आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोतः उद्धव ठाकरे
– चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत सरकारला कधी माहिती मिळाली? चिनी सैनिकांनी कधी सीमेवर कधी घुसखोरी केलीः सोनिया गांधी
– सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का? बाहेरील गुप्तरच यंत्रणांनी LACवरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का?: सोनिया गांधी
– लष्कराच्या गुप्तचर विभागाने प्रत्यक्ष ताबा रेषेवर चिनी सैनिकांची जमवा जमव आणि घुसखोरीबाबात कुठलीही माहिती दिली नाही का? गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे का? सरकारचं काय म्हणणं आहेः सोनिया गांधी
– सीमेवर जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. देशाला यासंदर्भात अश्वस्त केले पाहिजे. सीमेवर सध्या काय स्थिती आहे याची माहिती विरोधकांनाही दिली पाहीजेः सोनिया गांधी
– जवानांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे. जवानांनी शस्त्र ठेवावेत की नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केलं जातं. यामुळे अशा संवेदनशील प्रकरणी कराराचे पालन करणं गरजेचं आहेः शरद पवार
– भारत-चीनमध्ये झालेल्या पंचशील कराराचे पालन झाले पाहिजे, माकप नेते सीताराम येच्युरी यांचे मत
– भारताने अमेरिकेच्या आहारी जाऊ नये, डी राजा यांची भूमिका
– चीनविरोधात देशात संतापाची भावना आहे. अशा प्रसंगी सर्वपक्षांनी एकजुटीने सरकारला साथ दिली पाहिजेः नितीश कुमार
– भारतीय बाजारांमधील चीनचा निकृष्ट दर्जाचा माल रोखला गेला पाहिजे. चिनी मालाला गुणवत्ता नाही आणि तो वस्तू टिकाऊ नाहीः नितीश कुमार
– चीनला सोडू नका. टेलिकॉम, रेल्वे आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील चीनच्या प्रवेशावर बंदी घाला. यामुळे आपल्या समोर समस्या निर्माण होतील. पण चीनला प्रवेश देऊ नकाः ममता बॅनर्जी
– चीनमध्ये हुकूमशाही आहे. भारतात लोकशाही आहे. आपण एकजुटीने लढू. चीनचा हरवू. भारताचाच विजय होईल. ही वेळ एकजूट दाखवण्याची आहेः ममता बॅनर्जी
– चीनवर सरकारला कुठलीही कारवाई करायची आहे त्यासोब आम्ही आहोत. आम्ही सरकारसोबत आहोत आणि तेही कुठल्याही अटीशिवायः बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा
– सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींसह उपस्थित नेत्यांनी लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना वाहिली आदरांजली