Home देश पैसा पैसा amazon invest in airtel: अमेझॉनला खुणावतेय भारत; 'या' कंपनीत करणार २ अब्ज...

amazon invest in airtel: अमेझॉनला खुणावतेय भारत; ‘या’ कंपनीत करणार २ अब्ज डॉलरची गुंतवणूक! – sources says amazon in talks to invest 2 billion dollor in bharti airtel


नवी दिल्ली: करोना लॉकडाऊनच्या काळात परदेशी गुंतवणूक झाल्यामुळे रिलायन्स जिओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जगभरात आर्थिक संकट असताना देखील जिओत पाच कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. आता अशीच मोठी गुंतवणूक आणखी एका भारतीय कंपनीत होण्याची शक्यता आहे.

वाचा- गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा!

अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारी अमेझॉन कंपनी देशातील भारती एअरटेल मधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमधील २ अब्ज डॉलर इतका हिस्सा खरेदी करू शकते. या संदर्भात रॉयटर्सने तीन महत्त्वाची सोर्स दिले आहेत.

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

एअरटेल आणि अमेझॉन यांच्यातील हा करार झाला तर देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनीत अमेझॉनची सध्याच्या बाजारभावाने ५ टक्के हिस्सेदारी होईल. एअरटेलचे भारतात ३० कोटी ग्राहक आहेत. देशात सर्वात जास्त ग्राहक रिलायन्स जिओकडे आहेत.

वाचा- शहरात येण्याची गरज नाही; मोठ्या कंपन्या तुमच्या गावात येणार!

एअरटेल आणि अमेझॉनमधील कराराची चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा जगातील अनेक कंपन्या रिलायन्सचा जिओ कंपनीत गुंतवणूक करत आहेत. भारतात जिओ आणि एअरटेलमध्ये जोरदार स्पर्धा आहे.

वाचा- या कंपनीसाठी करोना ठरले वरदान; उत्पन्न झाले दुप्पट!

रॉयटर्सनुसार एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात कराराची चर्चा प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या ही चर्चा गोपनीय आहे. आम्ही भविष्यात काय करणार आहोत आणि काय नाही याबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत नाही, असे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.

अशी झाली जिओमध्ये गुंतवणूक

काही दिवसांपूर्वी फेसबुकने जिओतील ९.९ टक्के भाग ४३ हजार ५३४ कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर सिल्वर लेक कंपनीने ५ हजार ६५५ कोटींना १.५५ टक्के, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने ११ हजार ३६७ कोटी, जनरल अटलांटिकने १.३४ टक्के ५ हजार ५९८.३८ कोटींना विकत घेतले. अखेरीस केकेआरने ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या पाच कंपन्यांनंतर आता

आखाती देशातील ३ कंपन्या जिओमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. त्यात मुबाडाला इन्व्हेस्टमेंट जिओमध्ये १०० कोटी डॉलर म्हणजे ७ हजार ५०० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करू शकते. त्यानंतर क्रमांक येतो अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचा आणि सैदी अरबच्या द पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडचा या दोन्ही कंपन्या जिओत मोठी गुंतवणूक करू शकतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments