Home मनोरंजन Amir Khans Staff Tests Positive For Covid 19 Says Taking Mother For...

Amir Khans Staff Tests Positive For Covid 19 Says Taking Mother For Test – आमिर खानच्या घरात करोनाचा शिरकाव; कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह


मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना आता कलाकारांच्या घरातही करोनानं शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता अभिनेता आमिर खान याच्या घरातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सोशल मीडियावरील एक पत्रक पोस्टद करत आमिरनं यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याच्या घरातील कर्मचा-यांना करोनाची लागण झाल्याचं त्यात म्हटलं आहे.कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना तातडीची सर्व ती मदत करण्यात आल्याचंही आमिरनं म्हटलं आहे.
हॅपी बर्थडे: निलेश साबळेची फिल्मी लव्हस्टोरी
घरातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील इतरांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आल्याचंही आमिरनं म्हटलं आहे. तसंच आता आईची करोना चाचणी बाकी आहे. तिला मी घेऊन जाणार आहे. असं म्हणत आईचा रिपोर्टही निगेटीव्ह यावा साठी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी केली आहे. शेअर केलेल्या पत्रकात आमिरनं बीएमसी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. असं असलं तरी त्याच्या घरातील एकूण किती कर्मचारी करोनाग्रस्त आहेत, याची माहिती मात्र, त्यानं दिली नाही.

तुम्हालाही जास्त वीज बिल आलंय? ‘ही’ आहेत कारणं
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी करोना व्हायरसनं शिरकाव केला आहे. यापूर्वी बोनी कपूर यांच्या घरातील काही कर्मचार्‍यांना करोना झाला होता. तर अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या बिल्डिंगमध्येही करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला गेला होता. याशिवाय झोया मोरानी, निर्माता करीम मोरानी, शाजा मोरानी, किरण कुमार, कनिका कपूर आणि मोहिना कुमारी या सेलिब्रिटींनाही करोना झाला होता. तर गेल्या निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्या स्टाफमधील देखील दोन कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली होती. करणनं स्वत: ही माहिती बीएमसीला दिली होती.

दरम्यान, राज्यात विक्रमी संख्येने नवीन करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची स्थिती कायम असून, काल दिवसभरात राज्यात तब्बल ५ हजार २५७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळं राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख ६९ हजार ८८३ इतकी झाली आहे. राज्यात काल दिवसभरात १८१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर उर्वरित १०३ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

police arrest animal thieves gang in aurangabad: जनावरे चोरणारी टोळी गजांआड – aurangabad crime news , police arrested gang who thieves animal

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबादजनवारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी तुषार जाधव...

Recent Comments