Home देश amit shah: उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचं चुकलंच! अमित शहांनी दिला 'हा'...

amit shah: उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचं चुकलंच! अमित शहांनी दिला ‘हा’ सल्ला – maharashtra governor bhagat singh koshyari could have been restrained in choice of words to uddhav thackeray says amit shah


नवी दिल्लीः महाराष्ट्रातील मंदिरं बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( bhagat singh koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना उत्तर दिलं होत. या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिल्ला दिला आहे. कोश्यारी शब्द जपून वापरायला हवेत, असं शहा म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र मी वाचलं आहे. या पत्रात कोश्यारी यांनी काही संदर्भ दिले आहेत. कोश्यारी यांनी शब्द जरा जपून वापरायला हवे होते. त्यांच्या शब्दांची निवड चुकली, असं अमित शहा म्हणाले.

‘शिवसेना स्वतःहून सोडून गेली, आम्ही काय करणार’

अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शहा यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत ३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे स्वतःहून एनडीएतून बाहेर पडले आहेत. आम्ही नाही त्यांना बाहेर काढलं. आम्ही काय करू शकतं. दोन्ही पक्षांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. शिवसेनेसाठी दार उघडं किंवा बंद असं काही मुद्दा नाही. तसं काही घडलेलं नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते कोश्यारी?

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केल्यानंतर लगेचच कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ‘राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असे प्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केले होते. कोश्यारी यांच्या राजकीय भाषेतील पत्रावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता.

हाथरस प्रकरणः अमित शहा म्हणाले, ‘पोलिस स्टेशन स्तरावर झाली चूक’

‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही’

कोश्यारींना मुख्यमंत्री ठाकरेंचं उत्तर

मंदिरं उघडण्यासाठी भाजपनं राज्यात आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनीही मंदिरांबाबत मुख्यमंत्रांना पत्र लिहिलं होतं. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे स्टाइलमध्ये उत्तर दिलं. ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Vaccine: फोटोफीचर: देशी लस Covaxin ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता – bharat biotech to test third phase of coronavirus vaccine vaccine covaxin from next...

देशी करोना लस Covaxin ची शेवटच्या टप्प्यातील चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकला ड्रग रेग्युलेटर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) तिसऱ्या...

Armenia Azerbaijan War Updates: तिसऱ्या महायुद्धाची चाहुल? आर्मेनिया-अजरबैझान युद्धात ‘हा’ देश उतरणार! – armenia azerbaijan war turkey says it will send troops to help...

अंकारा/येरेवान/बाकू: आर्मेनिया आणि अजरबैझान दरम्यानचे युद्ध दोन आठवड्यानंतरही थांबले नाही. दोन्ही देशांकडून हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे आता तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त...

काँग्रेसला निवडणुकीचे वेध

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जिल्हा काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत निश्चित नसले...

Recent Comments