Home देश amit shah: चीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला? अमित शहा म्हणतात... - vigilant...

amit shah: चीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला? अमित शहा म्हणतात… – vigilant for every inch of land no one can take it amit shah amid china standoff in ladakh


नवी दिल्ली : लडाखमध्ये सुरू असेलल्या भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केलंय. ‘मोदी सरकार देशाच्या एक-एक इंच जमिनीला वाचवण्यासाठी संपूर्णत: सजग आहे. कुणीही या जमिनीवर बळजबरीनं ताबा मिळवू शकणार नाही’ असं अमित शहा यांनी शनिवारी म्हलंय. चीनसोब लडाखचा वाद सोडवण्यासाठी भारत सरकारकडून सैन्य आणि राजनैतिक स्तरावर हरएक प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

चीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला आहे का? या प्रश्नावर त्यांनी म्हटलं ‘आम्ही आपल्या एक-एक इंच भूभागासाठी जागरूक आहोत. त्यावर कुणीही कब्जा करू शकणार नाही. आपलं सुरक्षा दल आणि नेतृत्व देशाचं सार्वभौमत्व आणि सीमेच्या रक्षणासाठी समर्थ आहेत, प्रतिबद्ध आहेत’. ते एका मुलाखतीदरम्यान बोलत होते.

वाचा :उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचं चुकलंच! अमित शहांनी दिला ‘हा’ सल्ला
वाचा :हाथरस प्रकरणः अमित शहा म्हणाले, ‘पोलिस स्टेशन स्तरावर झाली चूक’

आगामी बिहार निवडणुकीसंदर्भातही त्यांनी आपला विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीत एनडीएला दोन-तृतीयांश बहुमत मिळेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. नीतीश कुमार हेच निवडणुकीनंतर राज्यातील पुढचे मुख्यमंत्री असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ‘बिहारमध्ये जदयूनं भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या तर भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाणार का?’ असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ‘यात कोणताही प्रश्न नाही. नीतीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. आम्ही ही सार्वजनिक घोषणा केलीय आणि आम्ही याबद्दल प्रतिबद्ध आहोत’ असं अमित शहा यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, बिहारमध्ये निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळत आहेत.

पश्चिम बंगालबाबत बोलताना, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात परिस्थिती बदललेली दिसेल आणि इथंही भाजप सत्तेत येईल, असंही अमित शहा यांना वाटतंय.

वाचा :बलिया हत्याकांडातील फरार आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊत अटक
वाचा :देशात करोना संक्रमणाचा आकडा ७५ लाखांच्या जवळपासSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments