Home देश amit shah: 'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही' -...

amit shah: ‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही’ – president rule in west bengal is not wrong says amit shah


नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी पश्चिम बंगाल सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या परिस्थितीविषयी मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे आणि सरकारचं याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात विरोधी पक्षाचे नेते मारले जात आहेत आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप नेत्यांची मागणी चुकीची नाहीए, असंही अमित शहा म्हणाले.

पश्चिम बंगाल सरकारला घेरलं

अमित शहा यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळ आले. पण तिथे कोणतीही चांगली व्यवस्था केली गेली नव्हती. बजेट घोटाळ्यांमध्ये गेला. केंद्र सरकारकडून जे धान्य पाठवलं गेलं त्यातही घोटाळे झाले. करोनासाठी ज्या प्रकारची व्यवस्था केली गेली पाहिजे होती तीदेखील झाली नाही, असा आरोप अमित शहांनी केला.

राज्यात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. बॉम्ब बनवण्याचे कारखाने प्रत्येक जिल्ह्यात आहेत. सर्वात चिंता म्हणजे लोकशाहीत विरोधी पक्षनेत्यांची हत्या केली जात आहे. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात असं घडत नाही. यापूर्वी अशा घटना केरळमधून समोर यायच्या. पण आता तिथेही तसं घडत नाही. यावेळी पश्चिम बंगालमध्ये बदल होईल आणि भाजपचे सरकार येईल, असं अमित शहा म्हणाले.

भारत-तैवान जवळीकने चीनचा तीळपापड, आता भारताला दिली ‘ही’ धमकी

करोना संकट: PM मोदींची अधिकाऱ्यांशी चर्चा, लसींच्या वितरणासंबंधी दिले आदेश

‘राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची नाही’

पश्चिम बंगालमधील भाजप नेते सतत राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करत आहेत. या बद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न मुलाखती दरम्यान शहांना केला गेला. जे राजकीय पक्ष तिथे काम करत आहेत, त्यांची मागणी परिस्थितीनुसार योग्य आहे. तेथील परिस्थिती पाहिल्यास त्यांची मागणी योग्य आहे, असं उत्तर अमित शहांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik municipal corporation: पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड – nashik municipal corporation has announced bonus to employees

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी, आयुक्त कैलास जाधव यांनी सानुग्रह अनुदानाबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाही 'गुड...

Nashik: २० लाख रुपयांची बॅग घेऊन सराफ दुचाकीवरून जात होता; भर गर्दीत… – businessman robbed rs 20 lakh in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: सोने-चांदी खरेदीसाठी दुचाकीवरून आलेल्या सराफाकडील पैशांची बँग चोरट्यांनी हातोहात लंपास करून पोबारा केल्याची धक्कादायक घटना सराफ बाजारातील मारुती...

Coronavirus India update: करोना: देशात २४ तासांत वाढले ४८,६४८ रुग्ण, मात्र सोबत ‘ही’ गुडन्यूज – Coronavirus India Sees 48648 New Corona Cases In Last...

नवी दिल्ली: देशातली दररोज आढळणाऱ्या करोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या ५० हजार हजारांच्या आसपास पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Minstry) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी...

Recent Comments