Home मनोरंजन amitabh bachcchan: अमिताभ बच्चनसह इतर ज्येष्ठांना आत येण्यास सक्त मनाई आहे! -...

amitabh bachcchan: अमिताभ बच्चनसह इतर ज्येष्ठांना आत येण्यास सक्त मनाई आहे! – no entry for seniors


कल्पेशराज कुबल

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासू ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण आता ही मागणी सरकारने फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह ‘केबीसी’सह अनेक मालिकांच्या सेटवर सीनिअर्सना येण्यास परवानगी नसेल.

मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं काही नियम-अटींसह परवानगी दिली. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना-तंत्रज्ञांना चित्रीकरणात भाग घेता येणार नाही ही त्यातली एक प्रमुख अट होती. या अटीसह आणखी काही अटींचा फेरविचार करावा, अशी मागणी मनोरंजनसृष्टीनं सरकारकडे केली होती. त्यापैकी काही अटींमध्ये बदल करण्यात आला असला, तरी ज्येष्ठांना मात्र सेटवर येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही काळ सीनिअर कलाकारांना सेटवर नो एंट्री असेल.


नव्या नियमांसह चित्रीकरण करण्यात निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर काही अडचणी उभ्या राहिल्या. ज्येष्ठांना चित्रीकरणासाठी परवानगी नसणं ही त्यापैकी एक प्रमुख अडचण होती. म्हणूनच आठवडाभरापूर्वी ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन’ आणि ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’नं, हा नियम शिथिल करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. परंतु, ज्येष्ठ कलाकारांची सुरक्षितता लक्षात घेऊन राज्य सरकारनं निर्मात्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.

महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या बाराव्या पर्वाची घोषणा लॉकडाउनच्या दिवसात झाली होती. येत्या महिन्यात मुख्य कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात होणार होती. परंतु, ज्येष्ठांबाबतची मागणी फेटाळून लावण्यात आल्यानं बिग बींना चित्रीकरणात भाग घेता येणार नाहीय.


मराठी टीव्ही मालिकांवर नजर टाकली असता, रोहिणी हट्टंगडी (डॉक्टर डॉन), प्रदीप वेलणकर (ह.म.बने तु.म.बने), अच्युत पोतदार (माझा होशील ना), रवी पटवर्धन (अग्गबाई सासूबाई), सुनील गोडबोले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण) आदी अनेक ज्येष्ठ कलाकार मालिकांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

तसंच वंदना गुप्ते, अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, उज्वला जोग, नयना आपटे आदी अनेक ज्येष्ठ कलाकारही टीव्हीच्या पडद्यावर सक्रिय आहेत. परंतु, त्यांना चित्रीकरणापासून लांबच राहावं लागणार आहे. वयोवृद्ध मंडळींना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हा नियम चित्रीकरणाच्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

बॉलिवूडमध्ये काय?

अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परेश रावल, नसिरुद्दीन शहा यासारखे अनेक ज्येष्ठ कलाकार सध्या सिनेविश्वात सक्रिय आहेत. त्यांचे काही चित्रीकरणाचे प्रकल्प लॉकडाउनपूर्वी सुरू होते. नियमानुसार त्यांना काम करता येणार नाहीय. आगामी ‘सडक २’ सिनेमाच्या चित्रीकरणाची चिंता वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे अगोदरच चित्रीकरणाचं काम ठप्प होतं. आता चित्रीकरणासाठी सूट मिळालेली असून देखील दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्यांच्या ‘सडक २’च्या चित्रीकरणाचं काम पुढे सुरु करता येत नाहीय. त्याचप्रमाणे दुसरीकडे ‘कुली नंबर १’ सिनेमाच्या चित्रीकरणात काम देखील थोडं बाकी आहे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना देखील चित्रीकरणाला सुरुवात करता येत नाहीय.


कोणत्या नियमांतून सूट?

चित्रीकरणाच्या सेटवर पूर्णवेळ डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण्वाहिका असायला हवी असा नियम सरकारनं आणला होता. परंतु राज्याची सध्याची स्थिती पाहता वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक सेटवर पूर्णवेळ वैद्यकीय सुविधा उभारणं शक्य होणार नाही. त्यामुळे विभागीय स्तरावर वैद्यकीय उपाययोजना आखण्याची सवलत मिळावी; अशी विनंती निर्मात्यांनी केली होती. त्यामुळे सरकारनं चित्रीकरणाच्या मार्गदर्शक तत्वातून हा नियम वगळला आहे. सेटवर प्रथमोपचारांची सोय असावी. आणि वेळप्रसंगी चित्रीकरणस्थळापासून नजीकच्या रुग्णालयात जाण्यासाठी गाडीची व्यवस्था निर्मात्यांनी करावी; असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसंच सेटवर लक्ष ठेवण्याचा हक्क केवळ प्रशासनाला असून, इतर कोणत्याही संघटनेला हा अधिकार नाही; असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

nana patole latest news: Nana Patole: महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार!; नाना पटोले यांनी केले ‘हे’ मोठे विधान – congress will come to power in...

हायलाइट्स:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला बैठकांचा धडाका.पालिका निवडणुकीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना.आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल: पटोलेमुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नव्या दमाचे...

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

Recent Comments