Home देश amphan super cyclone: 'अम्फान'चा धोका वाढला; १९९९ नंतर भारतासमोर दुसऱ्या 'सुपर सायक्लोन'चे...

amphan super cyclone: ‘अम्फान’चा धोका वाढला; १९९९ नंतर भारतासमोर दुसऱ्या ‘सुपर सायक्लोन’चे संकट – amphan now a ‘super cyclone’ and it is a serious issue, the only other cyclone in odisha in 1999 was very deadly said ndrf chief


नवी दिल्लीः ‘अम्फान’ चक्रीवादळाने आता आणखी भयंकर स्वरूप धारण केले आहे. या चक्रीवादळाचे रूपांतर आज संध्याकाळी ‘सुपर सायक्लोन’ म्हणजे महाचक्रीवादळात झाले आहे. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. चक्रीवादळाचा सध्याचा ताशी वेग हा १६० किलोमीटर आहे. ओडिशाच्या किनाऱ्यापासून संध्याकाळी ते ७३० किलोमीटर अंतरावर होते. ‘सुपर सायक्लोन’मध्ये चक्रीवादळाचे रूपांतर झाल्याने या वादळामुळे वाऱ्यांचा ताशी वेग २३० ते २६५ किमी इतका वाढण्याची शक्यता हवामन विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात १९९९ मध्ये असे ‘सुपर सायक्लोन’ आले होते. त्यानंतर आता हे ‘सुपर सायक्लोन’ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. हे ‘सुपर सायक्लोन’ २० मे रोजी म्हणजे बुधवारी धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी सांगितलं. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १३ तुकड्या ओडिशात तैनात करण्यात आल्या आहेत. तर १७ तुकड्यांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये १९ तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत आणि ४ तुकड्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिली.

‘सुपर सायक्लोन’चा धोका ओडिशातील १२ जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालमधील कोलकातासह ५ जिल्ह्यांना अधिक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या २४ परगना, उत्तर २४ परगना, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‘सुपर सायक्लोन’मुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘अम्फान सुपर सायक्लोन’मुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. झाडं उन्मळून पडतील, बंधकाम सुरू असलेल्या इमारतींचे, रेल्वे रूळांचे नुकसान होऊ शकते. तर विजपुरवठाही खंडीत होऊ शकतो. यासोबतच पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टीवर पूर्व मिदनापूर या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ३ ते ४ मीटर इतक्या उंच लाटा उसळू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना

‘अम्फान सुपर सायक्लोन’मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासोबतच इतर उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो. केंद्र सरकार आवश्यकती सर्व मदत राज्यांना करेल, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलंय. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात ट्विट केलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Batla House encounter: बाटला हाऊस एन्काऊन्टर : १३ वर्षानंतर निर्णय, आरोपी आरिज खान दोषी सिद्ध – delhi court held guilty and convicted ariz khan...

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काऊन्टर प्रकरणात आज दिल्ली न्यायालयानं आरिज खान याला दोषी करार दिलंय. आरिज खान याची शिक्षा १५...

Recent Comments