Home शहरं नागपूर anil deshmukh: पोलिसांची कोरोना चाचणी शासकीय खर्चातून, गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती - government will...

anil deshmukh: पोलिसांची कोरोना चाचणी शासकीय खर्चातून, गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती – government will pay for police personnel coronavirus test fees


नागपूरः नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

वाठोड पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत असलेला आरोपी कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वाठोडा पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी केलेल्या कोरोना चाचणीची रक्कम तात्काळ देण्याचे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ज्या १० पोलिसांनी कोरोना चाचणी केल्या आहेत. त्या पोलिसांना तात्काळ रक्कम देण्याचे निर्देश दिले आहे. उर्वरित २२ पोलिसांची कोरोना चाचणी शासकीय खर्चातून करण्याचे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला स्व खर्चातून कोरोना चाचणी करावी लागणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ४५ पोलिसांचा करोनाने मृत्यू

महाराष्ट्रात १८ जूनपर्यंत ४५ पोलिसांचा करोना मृत्यू झाला आहे. एकूण ३८२० पोलिसांना करोनाची लागण झाली आहे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी ही माहिती दिली सोशल मीडियावरून दिली. ३८२० पोलिसांपैकी २७५४ जण करोनामुक्त झाले आहेत. तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; रुग्णवाढीचे ‘हे’ ताजे आकडे पाहाच

राज्यात सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात आज करोना संसर्गामुळे १४२ जणांचा मृत्यू झाला तर ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा असून आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments