Home शहरं कोल्हापूर anil deshmukh: पोलिस भरती प्रक्रिया लवकरच, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले... - home...

anil deshmukh: पोलिस भरती प्रक्रिया लवकरच, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले… – home minister anil deshmukh statement on police recruitment in maharastra


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: राज्यात रखडलेल्या आठ हजार पोलिसांच्या भरतीचे नियोजन लवकरच केले जाईल. करोनाचा संसर्ग नियंत्रणात येताच भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी गृहमंत्री देशमुख यांनी कोल्हापुरातील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले, कोरनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी राज्यात आठ हजार पोलिस पदांच्या भरतीची घोषणा झाली होती. यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, करोनामुळे भरती प्रक्रिया राबवता आली नाही. संसर्ग नियंत्रणात येताच भरती प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, राज्यात तीन हजाराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचे संक्रमण झाले असून, यामध्ये ५८ कोरनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संबंधित पोलिस कर्मचा-याच्या निवृत्ती कालावधीपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदानासह पोलिस वेल्फेअर आणि अन्य मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आदी उपस्थित होते.

मुंगेरीलाल के हसीन सपने

देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. पुन्हा येऊ-येऊ म्हणत होते, पण येऊ शकले नाहीत. अजूनही ते मुंगेरीलाल के हसीन सपने पाहात आहेत. पण, त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही, अशा शब्दात गृहमंत्री देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments