Home शहरं पुणे anil deshmukh: Anil Deshmukh 'त्या' पोलिसांच्या कुटुंबीयांना निवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवास: देशमुख...

anil deshmukh: Anil Deshmukh ‘त्या’ पोलिसांच्या कुटुंबीयांना निवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवास: देशमुख – big relief to the family of police personnel who died due to coronavirus


पुणे: ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत करोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार असून तसा निर्णय घेण्यात आला आहे’, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले. ( Anil Deshmukh on Maharashtra Police )

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना राज्यात ५४ पोलिसांना प्राण गमवावा लागला आहे. पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तीन महिन्यांमध्ये सरकारी निवासस्थान हे सोडावे लागते. याबाबत देशमुख म्हणाले, ‘राज्यामध्ये ५४ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी निवासस्थानामध्ये राहता येणार आहे. याबाबतचा निर्णय गृह विभागाने घेतलाआहे.’

‘जिल्हयात प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलिस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत’, असे आदेशही देशमुख यांनी दिले. जिल्ह्यातील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत देशमुख यांनी ही माहिती दिली. ‘नागरिकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे,’ अशी माहिती देशमुख यांनी दिली. ‘टाळेबंदीच्या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले होते. ते परत राज्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी’ अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या.

‘चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी महापालिकेकडून खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेला निधी मिळाला पाहिजे’, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. ‘करोना रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची कार्यपद्धती प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे, असे खासदार गिरीश बापट म्हणाले. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय सोयी उपलब्ध करून द्याव्या, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधे, रॅपिड टेस्टिंग टेस्टस आदी बाबींचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपये दंड – aurangabad municipality civic chief astik kumar pandey fined 5000 rupees to project director of rural...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिशा समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांसाठी प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून पुस्तके आणल्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय...

CSK: चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका – aakash chopra says chennai express now became goods train

नवी दिल्ली:IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी...

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या पावसामुळे विद्यापीठाने उद्या पासून सुरू...

Recent Comments