Home शहरं धुळे Anil Gote: Anil Gote 'फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असे म्हणणार...

Anil Gote: Anil Gote ‘फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असे म्हणणार नाही: अनिल गोटे – former bjp mla anil gote targets opposition leader devendra fadnavis


धुळे: ‘देवेंद्र फडणवीस यांनी माझा विश्वासघात केला पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस ”महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे”, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे कधी बोलणार नाही’, असं खळबळजनक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ( Anil Gote targets Devendra Fadnavis )

वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला ‘ही’ शंका

गोपीचंद पडळकर यांना सावध करतानाच गोटे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राजकारणावर बेफामपणे टीकास्त्र सोडले आहे. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

‘फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस ”महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे” असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे कधी बोलणार नाही. फडणवीस रोज रात्री १० नंतर वर्षा बंगल्यावर सार्वजनिक किंमत नसलेल्या चरित्रहीन लोकांना घेऊन बसायचे. आपल्याच पक्षातील नेत्यांविरुद्ध ते कारस्थानं करायचे. हे काही सुसंस्कृतपणाचे, सभ्यतेचे, मनाच्या दिलदारपणाचे लक्षण नाही’, अशा शब्दांत गोटे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. ‘एकही धनगर विधानसभेत निवडून येऊ नये यासाठी त्यांनी कारस्थाने केली. प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग केले. हे सारे मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर ‘मुसलमान निवडून आली तरी चालेल पण अनिल गोटे निवडून येता नये’, यासाठी फडणवीसांनी पैशांचा महापूर आणला होता, असा आरोप गोटे यांनी केला.

वाचा: आजोबांवरील टीकेला रोहितदादांचे खास ‘पवार स्टाइल’ उत्तर

‘आजपर्यंत कुठल्याही राज्यकर्त्याने धनगर समाजाला आरक्षण मिळूच नये, असा बंदोबस्त केला नव्हता. तो देवेंद्र फडणवीस यांनी केला. Tata Institute Of Social Science या संस्थेकडून सर्वेक्षण करून घेऊन गोड बोलून पाच वर्षे झुलवत ठेवले आणि शेवटी धनगर समजाच्या पाठीत खंजीर खुपसला. असे अनेकांच्या पाठीत इतके खंजीर खुपसलेत की गेल्या पाच वर्षांत फडणवीसांनी त्यांच्या पाठीत खुपसण्यासाठी बाजारात एकही खंजीर शिल्लक ठेवला नाही. याची त्यांना पुरेपूर जाणीव असल्यामुळेच ते खंजीराची भाषा करतात’, असा टोला गोटे यांनी हाणला. ‘माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, इतकी संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते. कुत्सीत विचार, लबाडी, खोटेपणा याचे एकत्रित रूप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध कारस्थान याच फडणवीसांनी रचले. नाथाभाऊ दाऊदच्या बायकोशी फोनवर बोलतात वगैरे गोष्टी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवल्या. नाथाभाऊंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यामुळे हे सारं घडलं’, असा गंभीर आरोपही गोटे यांनी केला.

वाचा: पवारांची करोनाशी तुलना करणारे पडळकर गोत्यात; होणार ‘ही’ कारवाई

पडळकरांची तुलना डासाशी

पडळकरांनी शरद पवारांना करोनाची उपमा दिली. त्यावरून त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्दीसमोर पडळकर डासाएवढेही नाहीत. तेव्हा डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही, त्यासाठी हीटचा एक फवाराही पुरेसा आहे, असे गोटे यांनी सुनावले. पडळकर भाजपात नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहेत. नवरी रुळल्यावर त्यांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हा त्यांच्या बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा राहणार नाही, अशा शब्दांत गोटे यांनी पडळकरांना सावध केले.

भाजपच्या राजकारणावर निशाणा

भाजपच्या राजकारणावरही गोटे यांनी निशाणा साधला. नानासाहेब कोकरे, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे आणि माझ्यासकट सर्वच बहुजन नेते भाजपच्या जातीवादाचे बळी ठरले. मोतीराम लहाने, उत्तमराव उर्फ नानासाहेब पाटील यांसारख्या नेत्यांचे तर नामोनिशाण शिल्लक ठेवण्यात आले नाही, अशी तोफ गोटे यांनी डागली. ‘मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. आता गेले दहा महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. ते दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत. त्यांच्या मनात कधीही द्वेषभावना मला तरी दिसली नाही. सागरासारखे विशाल मन आणि समोरच्या व्यक्तीला सर्वतोपरी मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. शरद पवारांना टीकेचा कधीच राग येत नाही. खुल्या दिलाने ते टीका स्वीकारतात. पण कुणी आव्हान दिलं तर मात्र ते सर्व शक्तिनीशी ते मोडून काढतात’, असे पवारांबद्दल गौरवोद्गारही गोटे यांनी काढले.

वाचा: शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना; पडळकरांची जीभ घसरलीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments