Home शहरं मुंबई Anil Parab: Anil parab: पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांकडून एसटीनं घेतले तिकिटाचे पैसे; परिवहन...

Anil Parab: Anil parab: पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांकडून एसटीनं घेतले तिकिटाचे पैसे; परिवहन मंत्री म्हणाले – nashik warkari will get their money; said anil parab


मुंबईः त्र्यंबकेश्वरहून निघणारी संत निवृत्तिनाथांच्या पालखीसोबत एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या २० वारकऱ्यांकडून तब्बल ७० हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासर्व प्रकरणावर राज्याचे परिवहन मंत्री यांनी अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. (ashadi ekadashi)

काही गैरसमजूतींमुळं नाशिकहून निवृत्ती महाराजांच्या पालखीसोबत पंढरपुरला गेलेल्या २० वारकऱ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती मिळाली. ही अतिशय चुकीची बाब असून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. असं अनिल परब यांनी सांगितलं. संताच्या पालख्या पंढरपुरला नेण्याचं भाग्य एसटीला लाभलं होतं. त्याबाबत मी एसटी महामंडळाला सूचनाही केल्या होत्या. तसंच, वारकऱ्यांचा येण्याजाण्याचा सर्व खर्च शासन करेल, असंही सांगितलं होतं. असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः … म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे

चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. आपण आपल्या महाराष्ट्राचे वर्णन संतांची भूमी असे करतो. पण संतांच्या या भूमीत संतांवरच अन्याय होताना दिसत आहे. निवृत्ती महाराजांच्या पालखीसोबत पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडून राज्य सरकारने विशेष बसच्या नावाखाली तब्बल 70 हजार रुपये घेतले. वास्तविक संतांच्या भूमीत हे विनामूल्य करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते. मात्र, विनामुल्य राहिले बाजूला, राज्य सरकारने नाशिक ते पंढरपूर या प्रवासाचे २० वारकऱ्यांकडून ७० हजार रुपये घेणे, हे नेमके कोणते गणित आहे? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे.

वाचाः मुंबईत पुन्हा संचारबंदी; पण ‘यांना’ वगळले; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

दरम्यान, आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. पंढरपुरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

Recent Comments