Home Uncategorised अण्णांची फटकार - Anna Hazare took the government by storm

अण्णांची फटकार – Anna Hazare took the government by storm

महाराष्ट्रात दारूचे दुकान व बियर बार ग्रीन व येलो झोनमध्ये सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला.अन ती सुरु झाल्याबरोबर लॉक डाऊन चा पूर्ण फज्जा उडाला .

हे विदारक चित्र महाराष्ट्रातील व जगातील सर्व जनतेनी डोळ्यांनी बघितले. हे पाहून अण्णा हजारेंनी सरकारला धारेवर धरले आहे.सरकारच्या या निर्णयाविरुद्ध अण्णांनि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याच त्यांनी म्हटले आहे.

भारतात कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीने प्रवेश केला असून, देशातील सर्व जनता यामुळे त्रस्त आहे.

सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीपोटी आजारी असलेले रुग्ण मृत्यूच्या भीतीने उपचार घ्यायला तयार नाहीत. दवाखान्यात जायला ते टाळाटाळ करतात .

त्यामुळे प्रत्येक राज्यात कोरोना चे किती रुग्ण आहेत हे सांगणे कठीण आहे.आजारावर अजून पर्यंत कुठलेही औषध बाजारात उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सोशल डिस्टेंस सिंग हाच एकमेव उपाय असल्याने त्याचे काटेकोरपणे पालन केल्यास काही अंशी या आजारावर अंकुश ठेवता येऊ शकतो.

या सर्व बाबी शासनाला माहित असतांनासुद्धा महाराष्ट्र सरकारने केवळ राज्याच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी दारू बंदी उठवली . त्यामुळे लॉक डाऊन चा पूर्ण फज्जा उडाला व लोकांना कोरोना ची अधिक लागण झाली असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.

लोकांच्या जिवापेक्षा राज्याचे उत्पन्न वाढविणे या सरकारला महत्त्वाचं वाटलं का ? हे सरकार लोकांचे हिताचे निर्णय घेत नाही.म्हणून आपण या निर्णयाचा निषेध करीत अहो ,असे अण्णांनी म्हटले आहे.

देशात महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत पुढे आहे.सध्याच सरकार केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नाही.सध्याच्या सरकारची अवस्था काळजीवाहू सरकार सारखी आहे.

असे दिसते अद्यावत सरकारला कोरोना सारख्या महामारीला आटोक्यात कसे आणायचे हे सुचत नाही.त्यामुळे आता मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांची बैठक बोलावली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे सुरू केले आहे.

हे असं करण्यापेक्षा शरद पवार यांच्यासारखे अनुभवी व धुरंदर नेतृत्वाच मार्गदर्शन घेतलं असतं तर राज्याचा महसूलही वाढला असता व कोरोना चा संसर्ग रोखता आला असता.किमान अण्णा हजारे सारख्या ज्येष्ठ समाजसेवकांचे फटकार सरकारला सहन करावे लागले तर नसते.!

राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने बाहेर येत आहे.ही तिसरी स्टेज असून यात समुदायामध्ये संसर्ग अधिक प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे .

अशा अवस्थेत महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शहरातील रेड झोन मधील वस्त्या सील केल्या अन् शहरांमध्ये बंदोबस्त कडक केला तर अजूनही परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.शासनाने या घडीला कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अन्यथा दर दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तिपटीने वाढत आहे.ती आणखी कितीतरी पटीने वाढेल म्हणून लॉक डाऊन मध्ये सरकारने दिलेली सूट ताबडतोब रद्द करावी व जनता कर्फ्यू तसेच पोलिसांचा कर्फ्यू सुद्धा कङक करावा.

अण्णांनी सरकारवर केलेली टीका व नाराजी शासनाने मनावर घेऊन योग्य व कठोर पावले उचलली तरच महाराष्ट्रातली ही महामारी आटोक्यात येऊ शकते.

संपादन – एडिटोरिअल चीफ श्री. मधुकर शेंडे

1 COMMENT

  1. B.D.KOTGIRE,CHAIRMAN LEGAL CELL MAHARASTRA FOR INTERNATIONAL HUMAN RIGHTS ASSOCIATION SUPREME COURT OF INDIA NEW DELHI-110001

    ABSOLUTELY TRUE !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती धुरा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड प्रभावित राज्यांतून महाराष्ट्रात हवाई आणि रेल्वेमार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे असून, संसर्ग नसलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेशास...

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

Recent Comments