Home देश antiviral drug for covid: करोनावर आले हे औषध, गोळीची किंमत १०३ रुपये...

antiviral drug for covid: करोनावर आले हे औषध, गोळीची किंमत १०३ रुपये – corona update glenmark launches antiviral drug for covid


नवी दिल्लीः करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने (Glenmark Pharmaceuticals) औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ‘डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

ग्लेनमार्क फार्मा ही औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील सहा महिन्यांपासून जगभरात करोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कुणालाही त्यात यश आले नव्हते. अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. पण ग्लेनमार्क फार्मान करोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध आणले आहे. याची एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे.

करोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबीफ्ल्यू ( FabiFlu) या ब्रँड अंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे करोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे.

व्हेन्टिलेटर हटवून कूलर सुरू केला, रुग्णाचा मृत्यू!

देशात करोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ

देशात करोनाचे रुग्ण सुरुवातीच्या तुलनेत सध्या वेगाने वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा दबाव आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मंजुरी मिळाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. फेविपिरावीरच्या उपयोगाने रुग्णांवर प्रभावी उपचार करता येणार आहे, असं ग्लेनमार्कचे अध्यक्ष आणि संचालक ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितलं.

दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, करोनाने न्युमोनिया वाढला

देशातील करोना रुग्णांची संख्य वेगाने वाढत आहे. आज एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. आज १४, ५१६ नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्णांची एकूण संख्या ही ३, ९५, ०४८ इतकी झाली आहे. तर करोनाने देशात एकूण १२, ९८४ जणांचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

Recent Comments