Home मनोरंजन Anushka Sharma and Virat Kohli: घरच्यांनाही नाही अनुष्का शर्माला भेटण्याची परवानगी, विराट...

Anushka Sharma and Virat Kohli: घरच्यांनाही नाही अनुष्का शर्माला भेटण्याची परवानगी, विराट कोहलीने वाढवली सिक्युरिटी – No Relatives And Gifts Allowed For Anushka Sharma And Virat Kohli | Maharashtra Times


मुंबई- ११ जानेवारीला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका मुलीचे आई- बाबा झाले.विराटने सोशल मीडियावर चाहत्यांना ही बातमी दिली. ही आनंदाची बातमी देतानाच त्याने थोडी प्रायव्हसी द्यावी अशी विनंतीही चाहत्यांकडे केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जवळच्या नातेवाईकांनाही इस्पितळात अनुष्काला भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे.

करोना व्हायरसमुळे कडक केली सुरक्षा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातलं स्टार कपल आहे. विराटने अनुष्काच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली लाखो लोकांनी त्याचं ट्वीट रिट्वीट आणि लाइक केलं. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी इस्पितळात तिने एका मुलीला जन्म दिला. यावेळी विराट-अनुष्काने इस्पितळातून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

अनुष्का- विराटने मुलीचं नाव ठेवलं ‘Anvi’? देवी लक्ष्मीशी आहे नावाचं कनेक्शन

कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद

एवढंच नाही तर इस्पितळातील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्पितळातली सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये अॅडमिट आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे. इस्पपितळाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचंही बोललं जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia Scorecard: Australia All Out On 294 Runs On Day 4 Of 4th And Final Test In Brisbane, India Required 324 Runs...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने...

Recent Comments