Home क्रीडा arif aafjakia slams shahid afridi: आफ्रिदी तुला लाज नाही वाटत? माजी महापौराच्या...

arif aafjakia slams shahid afridi: आफ्रिदी तुला लाज नाही वाटत? माजी महापौराच्या व्हिडिओने खळळबळ! – shahid afridi on his kashmir remark pakistan human right activist arif aajakia slams


कराची: भारतासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला असा काही दणका मिळाला आहे जो तो कधीच विसरणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मिरी जनतेवर होणारे अन्यायाबद्दल बोलणाऱ्या आफ्रिदीला पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ता आणि माजी महापौराने आरसा दाखवला आहे.

वाचा- माजी क्रिकेटपटूला करोनाची लागण; घरीच केले…

कराचीमधील जमशेद टाऊनचे माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी आफ्रिदीला त्याचा इतिहास वाचून दाखवला. काही दिवसांपूर्वी आफ्रिदी पाक व्याप्त काश्मीरमध्ये गेला होता. येथे मदत कार्य केल्यानंतर त्याने पंतप्रधान मोदी आणि काश्मीरवर टीका केली. अजाकिया यांनी यूट्यबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या POKमध्ये जाऊन आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान आणि लष्करावर टीका केली ती जमीन भारताची असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

वाचा- व्हिडिओ: ज्युनिअर सेहवागची तयारी; सचिनने केले कौतुक!

जो आफ्रिदी स्वत:च्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काही बोलत नाही, त्याला आता काश्मीरी जनतेची काळजी लागली आहे. पण हाच आफ्रिदी काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पैशांसाठी खेळायला जात होता, असे अजाकिया म्हणाले. या व्हिडिओत अजाकिया यांनी आफ्रिदीसोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील सोडले नाही. आफ्रिदी असो की इम्रान या लोकांची सवयच आहे की जास्तीत जास्त बूट चाटायचे.

POKमध्ये जाऊन आफ्रिदीने चार-पाच जणांना मदत केली. पण त्यासाठी तो २५ जणांचे संरक्षण घेऊन गेला होता. पाकिस्तान लष्कराने दिलेली भाषण वाचून दाखवले आणि घरात बेडरूममध्ये जाऊन बसल्याचे अजाकिया म्हणाले.

वाचा- ३६ क्रिकेटपटूंना दिली जाणार आर्थिक मदत!

गेल्या २० वर्षापासून पाकिस्तान लष्कर आफ्रिदीच्या जमातीमधील लोकांवर अन्याय करत आहे त्यावर तो काही बोलत नाही आणि आता त्याला काश्मीरी लोकांची काळजी लागली आहे. इंग्रज जेव्हा सोडून गेले तेव्हा काश्मीरच्या राजाने भारतात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तान लष्कराने काश्मीवर हल्ला केल्याचा इतिहास अजाकिया यांनी वाचून दाखवला.

वाचा- दलेर मेंहदीच्या गाण्यावर क्रिकेटपटूचा डान्स व्हायरल

पाकिस्तान लष्कराने गेली ७२ वर्ष देशाला लुटले आणि येथील लोकांचा खून केला. जगातील सर्वात नीच लष्कर जर कोणते असेल तर ते पाकिस्तानचे आहे, असा खळबळजनक आरोप अजाकिया यांनी केला .

पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाला होता आफ्रिदी…

सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जाता जाता : या, बसा डोक्यावर…

परवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या नवऱ्याला डोक्यावर घेऊन निघालेल्या एक उत्साही वैनी बघितल्या आणि जीव धन्य जाहला... हल्ली व्हॉट्सअप विद्यापीठामुळं जगभरातल्या अशा मनमौजेच्या...

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

Recent Comments