Home महाराष्ट्र arshad warsi on cm thackeray: 'उद्धव ठाकरे हे बहुधा पहिलेच असे मुख्यमंत्री...

arshad warsi on cm thackeray: ‘उद्धव ठाकरे हे बहुधा पहिलेच असे मुख्यमंत्री असतील’ – what arshad warsi said about maharashtra cm uddhav thackeray?


मुंबई: ‘मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच इतक्या मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलेले उद्धव ठाकरे हे बहुधा पहिलेच मुख्यमंत्री असतील,’ असं बॉलिवूडचा अभिनेता अर्शद वार्सी यांनी म्हटलंय. (Arshad Warsi praises Uddhav Thackeray)

वाचा: ‘निसर्ग’चा धसका! मुंबई विमानतळ काही तासांसाठी पूर्ण बंद

अर्शद वार्सीनं या संदर्भात एक ट्विट केलंय. ‘उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारत नाहीत तोच मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात पसरलेल्या जागतिक महामारीचा सामना त्यांना करावा लागला. तो लढा सुरू असतानाच आता वादळ येऊन ठेपलंय. दुसऱ्या कुणा मुख्यमंत्र्याला अशा आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल असं वाटत नाही,’ असं त्यानं ट्विटमध्ये म्हटलंय.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्याकडं नव्या आघाडीचं मुख्यमंत्रिपद आलं. उद्धव ठाकरे यांच्याकडं संसदीय कामकाजाचा कसलाही अनुभव नव्हता. विधिमंडळाच्या सभागृहाचे ते साधे सदस्यही नव्हते. त्यामुळं त्यांच्यासाठी सगळं काही नवीन होतं. अत्यंत कठीण परिस्थितीत मुख्यमंत्रिपदी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी हळूहळू कामकाज समजून घ्यायला सुरुवात केली होती. तोच कोविडच्या रूपानं साथीच्या रोगाचं संकट आलं. मुंबईत याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिस्थितीला गेल्या दोन महिन्यांपासून उद्धव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार तोंड देत आहे.

वाचा: उद्धव ठाकरेंना माझा फुल्ल सपोर्ट: अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमधून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांपुढं आव्हान आहे. याच अनुषंगानं अर्शद वार्सी यानं ट्विट केलं आहे.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याआधीही उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलंय. अर्शद वार्सी यांनी मुख्यमंत्र्यांचं थेट कौतुक करणं टाळलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments