Home संपादकीय Article News : स्वस्त रुग्णसेवेसाठी... - for cheap patient care ...

Article News : स्वस्त रुग्णसेवेसाठी… – for cheap patient care …


खासगी रुग्णसेवा स्वस्त होण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक अधिसूचना काढली असून, त्यानुसार कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये करोना अथवा इतर रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरपत्रकाशिवाय अधिक पैसे घेता येणार नाही. यामुळे रुग्णांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

डॉ. सुधाकर शिंदे

……………सध्याच्या करोनाकाळात राज्यामध्ये अनेक सरकारी रुग्णालये मोफत उपचार पुरवित आहेत. यामध्ये स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग, नेत्राशल्यचिकित्सा, कर्णदोष उपचार इत्यादी सेवांचा समावेश होतो. राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नि:शुल्क अथवा अत्यंत कमी शुल्कामध्ये या रुग्णालयांमधून उपचार दिले जातात. यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये तसेच संचालक, आरोग्य सेवा यांच्या अखत्यारीतील महिला रुग्णालये, सुपर स्पेशालिटी रुग्णालये, मानसोपचार रुग्णालये तसेच संचालक, वैद्यकीय शिक्षण यांच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली रुग्णालये यांचा समावेश होतो. याचबरोबर नगर पालिका, महापालिका, कँटोन्मेंट बोर्ड यांची रुग्णालये रुग्णांना मोफत अथवा अत्यल्प दराने उपचार पुरवित आहेत. या व्यतिरिक्त धर्मादाय रुग्णालये गरजू व आर्थिक कमकुवत रुग्णांना मोफत अथवा सवलतीने सेवा देतात.

महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील ८५ ते ९० टक्के कुटुंबांना योजनेच्या एक हजार अंगिकृत रुग्णालयांमध्ये ९९६ प्रकारचे आजार व शस्त्रक्रियांसाठी निःशुल्क उपचार पुरविण्यात येत आहेत. अंगिकृत रुग्णालये बहुतांश खासगी आहेत. या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक व ३१ जुलै २०२०पर्यंत पांढरी शिधापत्रिकाधारक कुटुंब पात्र आहेत.

अनेक खासगी रुग्णालये सशुल्क सेवा पुरवितात. या रुग्णालयांमधून रोखीने अथवा विमा पॉलिसीच्या माध्यमातून कॅशलेस उपचार मिळतात. ज्या रुग्णांकडे कोणतेही विमाकवच नाही, अशांच्या मनात खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेताना होणाऱ्या संभाव्य खर्चाची मोठी भीती असते. खासगी रुग्णालयांच्या अवास्तव शुल्क आकारणीबाबत शासनाकडे अनेक तक्रारी आल्या. करोना रुग्णांकडून भरमसाठ बिले वसूल केल्याच्या तक्रारीही आल्या. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांवर नियंत्रण ठेवण्याबाबत उपाययोजना करणे शासनाच्या विचाराधीन होते.

सध्या बहुतांश खासगी रुग्णालये करोना व इतर रुग्णांना सेवा पुरवित आहेत. हजारो डॉक्टर, नर्सेस जिवाची तमा न बाळगता करोना रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या उत्तम व निःस्वार्थ सेवांबाबत आपण कृतज्ञ असणे आवश्यक आहे. या खासगी रुग्णालयांचे विविध प्रकार आहेत. एक म्हणजे, मुंबईसारख्या महानगरातील मोठी रुग्णालये, ज्यांच्या दैनंदिन उपचारांचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे. दुसरा प्रकार म्हणजे, खासगी डॉक्टरांनी चालवलेली लहान-मोठी रुग्णालये. यातील बहुतांश रुग्णालये विविध विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर (तृतीय पक्ष प्रशासक कंपन्या – टीपीए) किंवा जीआयपीएसए-पीपीएन यांच्याशी करारनामे करून, विमा कंपनीने ठरविलेल्या दराने विमा सुरक्षाधारकांना उपचार पुरवितात. विविध विमा कंपन्याचे एकाच उपचारासाठी वेगवेगळे दर शकतात. रुग्णाकडे ज्या कंपनीचा विमा आहे, त्या कंपनीच्या दरानुसार शुल्क आकारले जाते. काही रुग्णालये वर नमूद केलेल्या कोणत्याही संस्थेशी करारनामा न करता स्वतंत्रपणे शुल्क आकारतात. या सर्व रुग्णालयांचे दर वेगवेगळे असून, रुग्णालयाचा आकार, खाटांची संख्या, दर्जा, शहर यानुसार दर बदलतात. खासगी रुग्णालयात भरती झालेल्या सर्वसामान्य करोना रुग्णाला दहा ते पंधरा दिवस राहावे लागल्यास, खर्चाचा आकडा फार मोठा होतो. तातडीचे उपचार देण्याची वेळ आल्यास रुग्णास जवळच्या खासगी रुग्णालयात भरती केले जाते. अशा वेळी रुग्णावर अथवा नातेवाइकावर आर्थिक ताण येतो. या सर्व अडचणींचा विचार करूनच, खासगी रुग्णालयांकडून करोना व इतर अत्यावश्यक उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी लागू करण्यात येणाऱ्या दरांवर नियंत्रणाबाबत विचारविनिमय चालू होता.

या पार्श्वभूमीवर शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व खासगी रुग्णालयांचे कमाल दर निश्चित झाले आहेत. खासगी रुग्णालयांतील करोनावरील उपचारांसाठी, त्याचबरोबर इतर अत्यावश्यक उपचारांसाठी, उदा. कर्करोग शस्त्रक्रिया, किमोथेरपी, हदय शस्त्रक्रिया इत्यादींसाठी कमाल दरमर्यादा निश्चित केली आहे. हे दर ३१ ऑगस्टपर्यंत लागू असतील. या अधिसूचनेनुसार सर्व रुग्णालयांना बिगर विमाधारक अथवा ज्यांचे विमाकवच संपले आहे, अशा रुग्णांना एखाद्या उपचारासाठी विमा कंपनीचे जे किमान दर आहेत, अशा जनरल (सामान्य) वॉर्डच्या दराने शुल्क आकारणे बंधनकारक आहे. या अधिसूचनेमध्ये पॅकेजमध्ये समाविष्ट असलेले व नसलेले उपचार, साधनसामग्री व इतर साहित्य यांची सविस्तर माहिती दिली आहे. ज्या रुग्णालयांचे विमा कंपनीशी करार नाहीत, अशांसाठी करोना आणि इतर आजारांसाठीचे दरपत्रक निश्चित केले आहे. अशा रुग्णालयांचे दर त्याचे ठिकाण व खाटांची संख्या यावर ठरले आहेत. या अधिसूचनेनुसार विमा कंपनीबरोबर करार नसल्यास, ठिकाण व खाटांच्या संख्येनुसार लागू असलेले दर दर्शनी भागात लावणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे.

किमान दर ठरविताना रुग्णालयांचा आर्थिक तोटा होणार नाही किंवा न पेलणारा आर्थिक भार पडणार नाही, याचा विचार करण्यात आला आहे. विविध उपचार व शस्त्रक्रिया यांचे दर ठरविताना, त्यामध्ये कोणत्या बाबी अंतर्भूत असतील व कोणत्या नाहीत, हे अधिसूचनेत नमूद आहे. उदाहरणार्थ, करोना रुग्णांसाठी उपचारांचे दर ठरविताना जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग यांचे दर वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटरसह किंवा त्याशिवाय अतिदक्षता विभागातील उपचार यांचे दर वेगवेगळे असतील. हे दर मुंबईमधील कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या या अधिसूचनेपूर्वीच्या दरांच्या तुलनेत २० ते २५ टक्के इतकेच आहेत. म्हणजेच यापूर्वी कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये एखाद्या उपचारासाठी एक लाख रुपये खर्च येत असेल, तर आता २५ हजार खर्च येईल. ठरवून दिलेल्या किमान दरामध्ये सर्वसाधारण आवश्यक चाचण्या, औषधे व उपचार अंतर्भूत केले आहेत. ज्या चाचण्या/ उपचार/ औषधे/ साहित्य यांचा खर्च स्वतंत्रपणे करावा लागतो, असे पीपीई किट, करोना चाचणी, सिटी स्कॅन व इतर स्कॅन, कर्करोगावरील किमती औषधे यांचा खर्च उपचारांच्या दरामध्ये समाविष्ट नाही. त्यासाठी रुग्णालये अधिसूचनेतील नियमानुसार खरेदी किमतीपेक्षा दहा टक्के अधिक आकारणी करू शकतात.

रुग्णालये या अधिसूचनेचे काटेकोर पालन करीत आहेत ना, यावर लक्ष ठेवण्याची, तसेच रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी महापालिका क्षेत्रांमध्ये मनपा आयुक्त, जिल्हा पातळीवर (मनपा क्षेत्र वगळून) जिल्हाधिकारी यांच्याकडे असेल. राज्य पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी हे सक्षम प्राधिकारी असतील. या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उचित दराने उपचार मिळतील व आर्थिक दिलासा मिळेल.

(लेखक राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Recent Comments