Home शहरं मुंबई Asha workers: ASHA workers: आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय...

Asha workers: ASHA workers: आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय – asha workers in maharashtra to get a pay hike


मुंबईः करोनाच्या संकटात पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या ६५ हजार आशासेविका आहेत. आशा सेविका व गटप्रर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून आशासेविकांच्या मानधनात २ हजार वतर आशा गटप्रर्तकांना दरमहा ३ हजार अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तशी तरतूदही करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ व्हावी अशी मागणी होत होती. करोना संकटाच्या काळात आशा सेविकांनी मोलाचा वाटा उचलला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आशा सेविकांचा प्रश्न मांडला होता. यावर उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती.

राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

रोजगार हमी योजनेशी निगडीच फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्यावरील कर अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी

राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार

करोनाच्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.

कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments