Home शहरं जळगाव ashadi ekadashi 2020: ashadi ekadashi: अवघ्या २० वारकऱ्यांसह संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरसाठी...

ashadi ekadashi 2020: ashadi ekadashi: अवघ्या २० वारकऱ्यांसह संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान – sant muktabai paduka will reach in pandharpur ahead ashadi ekadashi


म. टा. प्रतिनिधी, जळगाव: आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या २० वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच मुक्ताईंच्या पादुका पायी वारीने न जाता बसने पंढरपूरला जात आहेत. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती. (ashadi ekadashi)

करोनाच्या काळात पारंपरिक पालखी सोहळा खंडित होतो की काय? अशी शक्यता असताना राज्य शासनाने मात्र, सकारात्मक निर्णय घेत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला नेण्यास अनुमती दिली आहे. एरवी ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास तसेच वारी दरम्यान, वारकऱ्यांना मिळणारी सेवा यावेळी खंडित झाल्याची खंत पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली. पालखी सोहळा प्रस्थानप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष अड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, आदींसह वारकरी व भाविकांची उपस्थिती होती.

वाचाः पडळकर मला विचारून बोलले नाहीत; पवार आणि ते बघून घेतील: उदयनराजे

हा पालखी सोहळा बसने प्रवास करत पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांना बुलढाणा येथे राजेंद्र शिंगणे यांच्याकडे नाश्ता, दुपारी जालना येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे फराळ व सायंकाळी वाशी (समरकुंडी फाटा) येथे चहापाण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पुढे वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांसोबत मुक्ताईंच्या पालखीची भेट होईल. तेथून पुढे सर्व मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील.

वाचाः ‘बरे झाले शरद पवारांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणले’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

renuka mata temple: देवी तुझ्या भक्तीने तहान, भूक हरली! – navratri 2020, history of renuka mata devi mandir

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्रीफुलंब्री - राजूर रस्त्यावरील रिधोरा येथे रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मात्र, यंदा करोनामुळे...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

Recent Comments