Home शहरं मुंबई ashadi wari 2020: Ashadi Wari 2020 वारीला आठ शतकांची परंपरा; कोर्टाने वारकऱ्यांचे...

ashadi wari 2020: Ashadi Wari 2020 वारीला आठ शतकांची परंपरा; कोर्टाने वारकऱ्यांचे ‘हे’ आर्जव फेटाळले – mumbai high court rejects warkari seva sangh writ petition


मुंबई: ‘करोना संसर्गाचे संकट असले, तरी केवळ १०० वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर हा केवळ सहा कि.मी.चा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पायी करण्यास परवानगी द्यावी आणि मागील आठ शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नये’, असे आर्जव करणारी ‘ वारकरी सेवा संघ ‘ची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे आजच्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून, वारीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Ashadi Wari 2020 )

वाचा: चित्रवारीतून वारीचा अनुभव; चार कलांची अद्भुत सांगड!

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव टाळण्याच्या हेतुने राज्य सरकारने संतांच्या पालख्या हेलिकॉप्टरने किंवा रस्तेमार्गे वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ‘वारीची परंपरा खंडित होऊ नये, यादृष्टीने केवळ १०० वारकऱ्यांना मुभा द्यावी. हे वारकरी सुरक्षित वावरचे सर्व नियम पाळून आणि सरकारकडून घातल्या जाणाऱ्या सर्व अटींचे पालन करून पायी प्रवास करतील. तसेच वारी झाल्यानंतर विलगीकरणातही राहतील. याविषयी ते लेखी हमीही देण्यास तयार आहेत’, असे सांगून राज्य सरकारला विनंती करूनही ती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यातील ‘वारकरी सेवा संघ’ने अॅड. मिहिर गोविलकर यांच्यामार्फत तातडीची याचिका केली होती.

वाचा: आषाढी एकादशी आणि व्रत

वारकरी सेवा संघाच्या याचिकेवर मंगळवारी न्या. प्रसन्ना वराळे व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी सरकारच्या निर्णयामागील कारणमीमांसा सांगून हा निर्णय वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठीच असल्याचे ठासून सांगितले. त्यानंतर ‘सद्यपरिस्थिती लक्षात घेता सरकारचा निर्णय योग्य आहे’, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in Nashik: हलगर्जीपणा ठरेल घातक! – negligence regarding health would be dangerous says expert

म. टा. प्रतिनिधी, नाशिकएकीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने भीतीचे सावट दूर होत असले, तरी सकाळी उकाडा, दुपारी मुसळधार पाऊस, सायंकाळी गारवा या...

Gujarat: Gujarat: २२ वर्षीय तरुणी वॉकसाठी बाहेर पडली, दुचाकीस्वार आला अन् – 22 year old girl molested by unknown man while evening walk in...

अहमदाबाद: २२ वर्षीय तरुणी इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडली असताना, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत...

Recent Comments