Home महाराष्ट्र Ashish Shelar and Sanjay Raut: ...म्हणून आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांचे आभार

Ashish Shelar and Sanjay Raut: …म्हणून आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांचे आभार


मुंबई: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलेल्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उपरोधिक उत्तर दिलं आहे. ‘लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे,’ असा टोला शेलार यांनी हाणला आहे. भाजपनं मांडलेली भूमिका योग्य असल्याचं मान्य केल्याबद्दल शेलार यांनी शिवसेना नेते व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आभारही मानले आहेत. (Ashish Shelar thanks Sanjay Raut)

Live: ८ जूनपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास सरकारची परवानगी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. परीक्षेऐवजी मागच्या सत्रातील गुणांचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना सरासरी गुणवाटप करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयावरून राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयास विरोध करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अलीकडंच एक निवेदन दिलं. माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांतील मिळून एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवला.

‘सामना’तील आजच्या अग्रलेखातून शिवसेनेनं सरकारच्या निर्णयाला ठाम पाठिंबा दर्शवला. मात्र, शेलार यांनी मांडलेल्या मुद्द्यावर मंत्री, कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ चर्चा करून निर्णय घेतील, असं त्यात म्हटलं आहे. एक प्रकारे शिवसेनेनं शेलार यांनी मांडलेला मुद्दा मान्य केला. तोच धागा पकडून शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला खोचक टोला हाणला आहे. ‘संजय राऊत यांनी आमची भूमिकाच अधोरेखित केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे योग्य वेळी निर्णय घेऊ असं सांगत आहेत. पण निर्णय घेण्याची ‘हीच ती वेळ आहे’ हे संजय राऊत यांनीच आपल्या मंत्र्यांना सांगायला हवं. हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे,’ असं शेलार यांनी म्हटलंय.

वाचा: करोना रुग्णाला एकच दिवस क्वारंटाइन ठेवलं; कोल्हापुरात राडाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments