Home शहरं मुंबई Ashish Shelar criticise Sanjay Raut : संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं...

Ashish Shelar criticise Sanjay Raut : संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं प्रत्युत्तर – bjp mla ashish shelar criticises shiv sena mp sanjay raut for targeting governor koshyari


मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका करणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘राजभवनाच्या नावानं बोंबा मारायला शिमगा आहे का?,’ असा खोचक टोला शेलारांनी हाणला आहे.

Live करोना : राज्यातील रुग्णसंख्येत प्रथमच मोठी वाढ

राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.

वाचा: ‘बाळासाहेब अन् उद्धव यांच्या राज्यात हाच फरक’

राऊत यांच्या या ट्विटला शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातूनच उत्तर दिलंय. संजय राऊत यांना शेलारांनी पत्रपंडित म्हणून हिणवलं आहे. ‘राजभवनाकडे तोंड करून काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे… काय होतं ते? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो. हे त्यांना सांगायचं आहे की राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथं पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते. समजनेवाले को इशारा काफी…,’ असं शेलार यांनी सुनावलंय.

वाचा: ‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना काम करू द्या’

‘माननीय राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. त्यांच्यावर दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा. पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का?,’ असंही शेलार यांनी पुढं म्हटलंय.

फोटोगॅलरी:
लॉकडाऊनमध्ये ‘मॉर्निंग वॉक’ला गेले, अन्…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

येथे जाड सुईने 'टुचुक' केले जाईल…

एक मार्च हा दिवस काळाच्या दंडावर कायमस्वरूपी अन् करकचून टोचून ठेवला गेला आहे, याबाबत आमच्या मनात किंचितही शंका नाही. साक्षात पंतप्रधान नमोजींनी या...

Recent Comments