Home शहरं मुंबई Ashok Shankarrao Chavan: अशोक चव्हाण यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Ashok Shankarrao Chavan: अशोक चव्हाण यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज


मुंबई: माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

वाचा: BKC कोविड रुग्णालयाबाबतची ‘ती’ माहिती साफ खोटी: बीएमसी

करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचा मुंबई आणि नांदेडमध्ये प्रवास सुरू होता. राज्य सरकारच्या अनेक बैठकांना ते उपस्थित राहत होते. तसंच, त्यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्येही परिस्थितीची पाहणी करत होते. करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते. त्यानंतर त्यांना विशेष रुग्णवाहिकेतून मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही ते कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी आपली मतंही मांडली होती.

एअरलिफ्ट करण्यास देण्यात आला होता नकार

करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यासाठी नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी परवानगी मागितली होती. प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधित मंत्र्यांना तात्काळ विमानाने मुंबईला घेऊन येण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवत त्यासाठी नकार दिला होता. त्यामुळं १२ तासांचा प्रवास करून त्यांना मुंबईला यावे लागले होते. त्यावरून उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती.

वाचा: जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं ‘ही’ मागणी

चव्हाण यांच्याप्रमाणेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून पुन्हा काम सुरू केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

Recent Comments