Home संपादकीय ashwathama milk story: ... आणि अश्वत्थामा गायीचं दूध प्यायला! - ashok samel...

ashwathama milk story: … आणि अश्वत्थामा गायीचं दूध प्यायला! – ashok samel article on mahabharat- ashwathama milk story


अशोक समेळ

बालमित्र द्रुपदाच्या आठवणीने उत्साहित झालेले द्रोण-कृपी अश्वत्थामासह पायपीट करत पांचाल नगरीला पोचले. बालपणीच्या आठवणीतून बाहेर येत द्रोणांनी भव्य पांचाल नगरीकडे पाहिलं आणि त्या तिघांचे डोळे दिपून गेले… एवढ्यात राजवाड्याच्या मोठ्या मुख्य दरवाजासमोर एका आडदांड पहारेकऱ्याने द्रोणाचार्यांना अडवलं आणि विचारलं, ‘कोण हवंय तुम्हाला? कोण आहात? कोठून आलात?’

तेवढ्यात तोऱ्याने द्रोणांनी उत्तर दिलं- ‘मी द्रुपदाला भेटायला आलोय. माझं नाव द्रोण. मी द्रुपदाचा बालमित्र आहे.’

त्यावर पहारेकऱ्याचा प्रश्न- ‘काय काम आहे?’

तसे द्रोण त्या मूर्खाकडे हसत पाहत म्हणाले, ‘अरे, मित्राचं मित्राकडे काय काम असणार? तू फक्त माझा निरोप सांग. माझं नाव ऐकून तुझा राजा द्रुपद स्वतः राजगादीवरून उठून धावत येईल. जा!’

अश्वत्थामा आपल्या तातांकडे प्रचंड अभिमानाने बघत होता… खरंतर त्या महाकाय पहारेकऱ्याला पाहून अश्वत्थामा घाबरला होता.

बऱ्याच वेळाने पहारेकरी आला आणि द्रोणांना म्हणाला, ‘आमच्या महाराजांनी तुम्हाला इथंच या देवडीवर बसायला सांगितलंय…’

द्रोण आतल्या आत निराश झाले… पण त्यांनी कृपी आणि अश्वत्थाम्याला तसं दाखवलं नाही…

जवळजवळ तीन तासानंतर द्रुपदाने द्रोणाला आत बोलावलं. खरंतर या तिघांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. तहानेसाठी पाणी नव्हतं, तरीही अशा अवस्थेत मुलासाठी अश्वत्थाम्याच्या दुधासाठी लाचार झालेला द्रोणातला बाप उसनं हास्य आणून द्रुपदासमोर उभा राहिला.

समोर एक याचक उभा आहे याच भावनेनं द्रुपद द्रोणाकडे पाहत म्हणाला, ‘बोल याचका तुला काय हवंय?’ त्यावेळी द्रुपदाच्या डोळ्यांत बालमैत्रीच्या कोणत्याही ओळखीच्या खुणा नव्हत्या… होता फक्त अहंकार!

हा अपमानही विलक्षण नम्रतेने झेलत द्रोण लाघवी स्वरात म्हणाले, ‘राजा द्रुपदा, मला ओळखलं नाहीस? तुझा मी बालमित्र द्रोण.’

… त्यावर द्रुपद कुत्सित स्वरात म्हणाला, ‘तू माझा मित्र? बालमित्र? स्वतःचा दरिद्री अवतार बघ! तुझा मित्र आला आहे, असा निरोप तू द्वारपालाबरोबर पाठवल्यावर, मी सिंहासन सोडून बाहेर धावत येऊन तुला ‘द्रोणा’ म्हणून मिठी मारावी अशी तुझी अपेक्षा होती? अरे तू फाटका माणूस माझा मित्र कसा होऊ शकतोस? दरिद्री ब्राह्मणा तुझ्या बुद्धीवर कुठलेही चांगले संस्कार झालेले दिसत नाहीत, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीय. अरे मूर्खा माझ्यासारख्या ऐश्वर्यशाली राजाची तुझ्यासारख्या क्षुद्र दरिद्री ब्राह्मणाशी मैत्री असेलच कशी? हां! कधीतरी मी तुझ्याशी सख्य केलं असेल ते फक्त माझ्या स्वार्थासाठी तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, तुझी धनुर्वेदातली हुशारी मला प्राप्त व्हावी म्हणून मी मैत्रीचा देखावा केला. अर्थात तो राजनीतितल्या शिष्टाचाराचा भाग होता. अन्यथा तू माझा मित्र नाहीस. आपली मैत्री कधीच होऊ शकत नाही!’ तरीही द्रोण म्हणाले, ‘अरे तू म्हणाला होतास की मी जेव्हा राजा होईन, तेव्हा ते राज्य तुझेही असेल.’

त्यावर द्रुपद तुसडेपणानं म्हणाला, ‘मला काही आठवत नाही. आता तू एक याचक म्हणून आला आहेस, तेव्हा जास्तीत जास्त या घडीला मी तुला एका रात्रीचं भोजन देतो. ते गीळ आणि जा!’ हा अपमान द्रोणांच्या जिव्हारी लागला. अश्वत्थाम्याच्या इवल्याशा मुठीतलं रक्त साकळलं… एवढ्यात द्रोण ओरडले-

‘द्रुपदा, तुझं भोजन तुलाच लखलाभ होवो! एक गोष्ट लक्षात ठेव… या तुझ्या उद्दामपणाचा आणि तू केलेल्या माझ्या अपमानाचा सूड मी जरूर घेईन! महाभयंकर असा सूड घेईन.’ तिथून द्रोण तडक निघाले, पण जर त्यावेळी द्रुपदाची नजर त्या लहानग्या पाच वर्षांच्या अश्वत्थाम्यावर गेली असती तर, त्याला त्याचा भविष्यकाळातला स्वकुलाचा नाश अश्वत्थाम्याच्या अंगारलेल्या डोळ्यांत दिसला असता! माता कृपी बिचारी डोळ्यातून आसवं गाळत त्या दोघांमागे फरफटत चालली होती!

आता द्रोणांचं ध्येय ठरलं होतं. पांचाल नरेशाचा अपमान सोसून द्रोण, कृपी आणि अश्वत्थाम्याला घेऊन, कृपीचा भाऊ कृपाचार्य याच्याकडे हस्तिनापूर या वैभवशाली नगरात आले. जिथे चक्रवर्ती कुरुचं महासाम्राज्य होतं आणि कुरुकुलस्तंभ भीष्माचार्य हे धर्मनिष्ठ-सत्यनिष्ठ होते. कृपीने सर्व हकीकत आपल्या जुळ्या भावाला कृपाला सांगितली. कृपाचार्याने सर्वांना आपल्याकडे ठेवून घेतलं! इथे अश्वत्थाम्याचे दिवस उत्तम जात होते. पण द्रुपदाच्या प्रसंगानंतर अश्वत्थाम्याने कधी खऱ्या गाईचं दूध मागितलं नाही, ते त्याला मिळवायचं होतं. मिळायचं होतं!

अश्वत्थामा हा बालपणापासून शंकरभक्त होता. तिथल्या जवळच्या केदारेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात तो रोज सकाळी जायचा. त्याच मंदिरात त्याला कुरुकुलातला पांडवपुत्र युवराज अर्जुन भेटला, जो शंकरभक्त होता. लहानपणी त्यांची जी दृढ मैत्री झाली ती पुढेही कायम राहिली. महाभारतातल्या महायुद्धात दोघं परस्परविरोधी लढले, पण दोघं समोरासमोर युद्धासाठी आले की त्यांच्यातला भावनिक कल्लोळ कर्तव्यावर मात करायचा!

एक दिवस कौरव-पांडव हे सख्खे चुलत भाऊ मैदानात विटी-दांडू खेळत होते. त्यांची विटी पडली विहिरीत. अश्वत्थामा त्यांचा हा खेळ पाहत होता. विटी विहिरीत पडल्यामुळे सगळे राजकुमार निराश झाले. एवढ्यात द्रोणाचार्य तिथे आले आणि त्यांनी परशुराम अस्त्राचा उपयोग करून ती विटी बाणावर बाण चढवून मुलांना काढून दिलीच, शिवाय स्वतःची अंगठी विहिरीत टाकून ती पण तशाच पद्धतीने मुलांना काढून दाखवली. सर्व राजपुत्र या चमत्काराने आश्चर्यचकित झाले आणि सगळे सरळ पितामह भीष्माचार्यांकडे गेले.

भीष्माचार्य राजपुत्रांसाठी उत्तम आचार्याच्या शोधात होते. अर्थात राजपुत्रांना तसे कृपाचार्य शिकवत होते, पण तसं ते प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान होतं. राजकुमारांना शस्त्र, अस्त्र, धनुर्विद्या शिकवण्यासाठी असाच द्रोणांसारखा गुरू हवा होता…! त्यांनी द्रोणाचार्यांना बोलावलं आणि धनुष्याची दोरी सैल करून राजकुमारांना संपूर्ण शास्त्र, सर्व विद्या शिकवण्यासाठी आचार्यपदाची नेमणूक केली. त्यांचा यथायोग्य सत्कार केला, त्यांची चौकशी केली, तेव्हा कळलं की द्रोणाचार्य हे भीष्मांचे गुरू परशुरामांचे आणि अग्निवेषांचे शिष्य आहेत. त्यानंतर भीष्माचार्य पुढे म्हणाले, ‘द्रोणाचार्य, कौरवांच्या या हस्तिनापुरात आपला आचार्य, गुरुवर्य म्हणून कायम मान राखला जाईल. हे राज्य आपलंही आहे… कारण आपण समस्त कौरवांचे आचार्य आहात!’

असं म्हणून त्यांनी अनेक प्रकारचं धन, गोधन आणि धनधान्यांनी समृद्ध असा एक उत्तम सुरक्षित प्रासाद दासदासींसह दिला… त्याच क्षणी द्रोणांचं आणि अश्वत्थाम्याचं दारिद्र्य खऱ्या अर्थानं दूर झालं…!

प्रासादात स्वतः कृपी एका पात्रात खऱ्या गाईचं, स्वतःच्या मालकीच्या गाईचं दूध घेऊन आली आणि दुधाचं पात्र अश्वत्थाम्यासमोर धरत म्हणाली, ‘पुत्रा, हे खऱ्या गाईचं दूध आहे, तेव्हा विनासंकोच पी!’

अश्वत्थामा मातेकडे आणि तातांकडे पाहत हसला… आणि पोट फाटेपर्यंत दूध प्यायला…! आणि हसत ओरडला, ‘आज मी खऱ्या गाईचं दूध प्राशन केलं!!’…

एकूणच हस्तिनापूर अश्वत्थाम्याला आवडलं आणि आपलं वाटलं!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: जिल्ह्यात ५०२ रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू – nagpur reported 502 new corona cases and 11 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या सात महिन्यांपासून करोनाने जिल्ह्यात घातलेले थैमान आता कुठे उतरणीला लागत असल्याची आशा काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या घटत्या संख्यावारीमुळे...

Imrati Devi Used Word Item For Kamal nath Mother And Sister, Video Goes Viral – कमलनाथांच्या आई-बहिणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या इमरती देवी व्हायरल

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका महिलेसाठी 'आयटम' हा शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. मध्य प्रदेशातही या...

Recent Comments