आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक स्थलांतरित मजूर परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लाभार्त्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोंडा येथून स्वयं सहायता समूहाच्या महिलांशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही महिलांनी आपल्या गावातील १० कुटुंबांना स्वावलंबी बनवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. यावेळी पंतप्रधानांनी पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ झालेल्या कुटुंबाशी संवाद साधला. या वेळी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या, असा सल्ला दिला. यावेळी देशातील विविध शहरांमधून लॉकडाउनमुळे परतलेल्या अनेक लोकांशी मोदींनी संवाद साधला. याबरोबरच त्यांनी उत्तर प्रदेशात येऊन नव्या रोजगाराची कशी कास धरली आणि सरकारी योजनांचा कसा लाभ घेतला याबाबच चर्चा केली.