Home देश atlas cycle company: अॅटलस सायकल कंपनी बंद; प्रियांका गांधींचा योगींवर निशाणा -...

atlas cycle company: अॅटलस सायकल कंपनी बंद; प्रियांका गांधींचा योगींवर निशाणा – atlas cycle company closed priyanka gandhi slams yogi government


गाझियाबादः जागतिक सायकल दिनालाच देशातील प्रसिद्ध अॅटलस सायकल कंपनी बंद झाली. यामुळे एका झटक्यात एक हजार जण बेरोजगार झाले. यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने इतके रोजगार दिले आणि करार केले, याचा सरकारने जोरदार प्रचार केला. पण नोकऱ्याच येत नाहीएत तर संपत आहेत, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. जागतिक सायकल दिनी गाझियाबाद येथील अॅटलस सायकल कंपनीचा कारखाना बंद झाला. यामुळे १ हजारांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक कंपन्यांशी रोजगार निर्मितीसाठी करार केले आणि शेकडो रोजगार दिले, असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. पण वास्तवात कारखाने बंद पडत आहेत आणि रोजगार संपत आहेत. नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारला आपल्या धोरणांमध्ये आणि योजनांमध्ये सुधारणा करावी लागेल, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

नोटीस बघून कर्मचाऱ्यांना धक्का

जागतिक सायकल दिनी बुधवारी सायकल तयार करणारी मोठी कंपनी अॅटलसने साहिबाबाद येथील कारखाना अनिश्चित काळासाठी बंद केला. कारखाना बंद झाला आहे हे कामगारांना माहितही नव्हते. नेहमी प्रमाणे कर्मचारी बुधवारी सकाळी कामावर आले. त्यावेळी कारखान्याच्या गेटवर कंपनीच्या व्यवस्थापनाने लावलेली नोटीस बघून त्यांना धक्काच बसला. कारखाना बंद झाल्याने काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळी आहे.

अॅटलस सायकल कंपनी आर्थिक संकटात

कंपनीची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. दैनंदिन साधन समग्रीसाठीही कंपनीकडे पुरेसे पैसे नाहीएत. यामुळे सर्वांना ले ऑफ देण्यात येत आहे. निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कंपनी कच्चा माल खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत कारखाना चालवता येऊ शकत नाही, असं कंपनीने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय. तर २ जूनपर्यंत आम्ही कामाला येत होतो. तोपर्यंत कुठलीही समस्या नव्हती आणि आम्हाला काहीच कळवण्यात आलं नाही. आणि तीन जूनला अचानक नोटीस दिली गेली. कंपनीच्या व्यवस्थापनाशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही, असं कामगारांचं म्हणणं आहे.

बहिणींवर सामूहिक बलात्कार; फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच हादरले

साहिबाबाद येथे अॅटलसचा देशातील सर्वात मोठा आणि अखेरचा कारखाना होता. ही कंपनी बंद झाल्याने आता अॅटलस सायकलचे उत्पादन बंद झाले आहे. १९४७ मध्ये भारत-पाक फाळणीनंतर कराचीतून भारतात आलेल्या जानकी दास कपूर यांनी १९५१ अॅटलस सायकल कंपनीची स्थापना केली. कंपनीचा साहिबाबादमधला कारखाना शेवटचा होता. यापूर्वी कंपनीने मध्य प्रदेशातील मालनपूर आणि हरयाणातील सोनीपत येथील कारखाना बंद केलाय. साहिबाबादमधील कारखान्यात सर्वाधिक उत्पादन केले जात होते. इथे जवळपास ४० लाख सायकल बनवल्या जात होत्या.

सरकारने मदत करावीः मायावती

बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी कामगारांच्या समर्थनात ट्विट केलंय. केंद्र सरकारकडून उद्योगांना आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा होत असताना उत्तर प्रदेशातील अॅटलसचा कारखाना आर्थिक टंचाईने बंद होणं ही चिंतेची बाब आहे. सरकारने तातडीने यावर लक्ष द्यावं, असं मायावतींनी म्हटलंय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

deepak maratkar murder: Pune: युवा सेना नेते दीपक मारटकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का – pune shiv sena youth wing leader deepak maratkar murder...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर हत्या प्रकरणातील (Deepak Maratkar murder case) सर्व आरोपींवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली...

Election Commission: ‘निवडणूक प्रचार सभेत मास्क घाला, शारीरिक अंतर पाळा’; निवडणूक आयोगाने खडसावले – bihar assembly election 2020 election commission writes letter to all...

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आणि सरचिटणीसांना पत्र लिहिले आहे. देशात सुरू असलेला...

sex with chicken: विकृतीचा कहर! कोंबड्यांसोबत करायचा सेक्स, पत्नी काढायची व्हिडिओ – 37 years old perverted person jailed three years for having sex with...

लंडन: लैंगिक वासना शमण्यासाठी विविध मार्गांचा वापर काहीजण करत असतात. मात्र, काहीजण विकृत आणि किळसवाणा मार्गाचा अवलंब करतात. असाच एक प्रकार समोर आला...

Recent Comments