Home देश पैसा पैसा atm withdrawal during lockdown: लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी ATMचा इतका केला वापर! - in...

atm withdrawal during lockdown: लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी ATMचा इतका केला वापर! – in april during lockdown cash with drawal from atm dips near to half mark


मुंबई: करोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या तीन महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी अनावश्यक खर्च कमी केला. गरजेच्या गोष्टींची खरेदी केल्यामुळे अधिक पैसे वापरले गेले नाही. आगामी आर्थिक संकटाचा विचार करून देशभरातील नागरिकांनी अतिरिक्त खर्च टाळला. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. तेव्हापासून ATM मधून पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

वाचा- बाप रे! ८ लाख नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात ATM मधून काढण्यात आलेले पैसे निम्म्यावर आले आहेत. लॉकडाऊनमुळे या महिन्यात फक्त १.२७ लाख कोटी रुपये ATM मधून काढले गेले. मार्च महिन्यात ही रक्कम २.५१ लाख कोटी इतकी होती. एप्रिल महिन्यात ATMच्या वापराचे प्रमाण देखील कमी झालंय. मार्च महिन्यात ५४.७१ कोटी हे प्रमाण एप्रिलमध्ये २८.६६ कोटी इतके खाली आले.

वाचा- कोटींची ऑफर नाकारली; आता होतोय अब्जोपती!

देशात एप्रिल महिना संपूर्ण लॉकडाऊनमध्ये गेला. यामुळे सर्व राज्यात लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद होते. लोकांना देखील येण्या जाण्याची परवानगी नव्हती. या महिन्यात कार्डचा वापर देखील कमी झाला. एकूण ८८.६८ कोटी कार्डचा वापर झाला. त्यापैकी ५.७३ कोटी क्रेडिट कार्ड तर ८२.९४ कोटी डेबिट कार्ड होते. मार्च महिन्यात हीच संख्या ८८.६३ कोटी इतकी होती. देशात एकूम २.३४ लाख ATM तर ५०.८५ लाख POS टर्मिनल आहेत.

वाचा- येथे नोकऱ्या आहेत; पण कामासाठी माणसं नाहीत!

लॉकडाऊनच्या काळात POS टर्मिनल मधून पैसे काढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात POS टर्मिनल वापरण्याचे प्रमाण ४०.८७ लाख इतके होते. हे प्रमाण मार्च मध्ये ३३.६९ इतकी होते. POSमधून १११ कोटी रुपये काढण्यात आले. मार्च मध्ये ११० कोटी रुपये काढले गेले. मायक्रो ATM आधारीत पेमेंट सिस्टमचा वापर दुप्पट झाला आहे. हे प्रमाणे मार्च मध्ये ३४४.९८ लाख इतके होते. ते एप्रिलमध्ये ८७५.५४ वर गेले.

हे देखील वाचा-
जेफ बेजोस होणार पहिले ट्रिलेनिअर; तर अंबानी…
वर्क फ्रॉम होम सुस्साट; पगार कपात केली तरी चालेल पण..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

Recent Comments