आणखी एका युवकाला नाशिक मधून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलं. या प्रकरणी 24 तासांमध्ये 2 जणांना अटक केली आहे.
मुंबई 24 मे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी मुंबईतुन अटक करण्यात आली होती. त्या अटक करण्यात आलेल्या तरुणाला सोडा नाहीतर परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी उत्तर प्रदेश पोलिसांना पुन्हा एकदा मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रेदेश एटीएसने महाराष्ट्र पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर कारवाई करत आणखी एका युवकाला नाशिक मधून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलं. या प्रकरणी 24 तासांमध्ये 2 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी शनिवारी मुंबईतल्या चुनाभट्टी इथल्या एका युवकाला अटक केली होती. त्याने कबुलीही दिली आहे. त्याला कोर्टात हजर करून उत्तर प्रदेश ATSच्या ताब्यात दिलं जाणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.
कमरान अमीन खान (वय 25) असं आरोपीचं नाव आहे. ज्या नंबरवरून फोन आला त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याची माहिती घेत मुंबई पोलिसांना कळवलं. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याचा माग काढला आणि गुप्त माहिती गोळा केली. त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा मेसेज मिळाला होता.
‘मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे,’ अशी धमकी देत एका विशेष समुदायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शत्रू बनले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटलं होते. या प्रकरणी गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 505(1)b 506,आणि 507नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट
8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस या मोबाइल क्रमांकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती गोमती नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी एसटीएफकडे सोपवण्यात आली आहे.
First Published: May 24, 2020 11:38 PM IST