Home शहरं नागपूर attack on railway employees: पाणी न दिल्याच्या रागातून रेल्वे कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा...

attack on railway employees: पाणी न दिल्याच्या रागातून रेल्वे कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न – attack on railway employees over drinking water in nagpur


नागपूर: वाद सोडविण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला छतावरुन खाली पाडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना अजनीतील जयभीमनगर येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. राकेश सिद्धार्थ वासनिक (वय ३५) असे जखमीचे नाव आहे. तो रेल्वेत ट्रॅकमन आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी कुख्यात अखिल वासे याच्याविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

राकेश याचा मित्र रोहित संतोष गजभिये (वय २८) हा जयभीमनगर येथे राहतो. तो पेटिंगचे काम करतो. शनिवार रात्री अखिल हा रोहित याच्या घरी आला. दरवाजा ठोठोवला. रोहित याच्या आईने दरवाजा उघडला. अखिल याने रोहित याच्या आईला पाणी प्यायला मागितले. अखिल गुन्हेगार असल्याने रोहित याच्या आईने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे अखिल याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. रोहित व त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. रोहित याला जाग आली. त्याने राकेश याला मदतीसाठी बोलाविले. राकेश तेथे पोहोचला. यावेळी अखिल हा छतावर होता. राकेश याने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अखिल याने राकेश याला लाथ मारली. तो छतावरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. अखिल हा पसार झाला. रोहित व त्याच्या मित्रांनी राकेश याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसही तेथे पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अखिल याचा शोध सुरू केला आहे. अखिल हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याला तडीपारही करण्यात आले होते, अशी माहिती आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments