Home शहरं औरंगाबाद Aurangabad Corona Update: चाचण्या, ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश - aurangabad...

Aurangabad Corona Update: चाचण्या, ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश – aurangabad additional commissioner b b nemane has directed to increase corona test and contact tracing


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीपीसीआर करोना चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सोमवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभांच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे याकडे लक्ष द्या, पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले.

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, सर्व आरोग्य अधिकारी, सर्व वॉर्ड अधिकारी, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम या बद्दल प्रशासकांनी काढलेल्या आदेशाचे अंमलबावणी काटेकोरपणे करा, आदेश मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे त्या म्हणाल्या. ज्या भागात करोनाचे वीसपेक्षा जास्त रुग्ण आढळतील तो भाग सील करा, बाधित व्यक्तीच्या घरावर स्टिकर लावा अशी सूचना त्यांनी केली.

नेमाने यांनी करोना चाचण्या वाढवण्याचे व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले. नागरिकांना घाबरवणे किंवा त्यांच्याकडून दंड वसूल करणे हा महापालिकेचा उद्देश नाही, तर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे हाच या सर्व उपाययोजनांच्या मागचा उद्देश आहे असे ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Pune: पुणे: हॉटेलच्या नावाखाली सुरू होते हुक्का पार्लर, पोलीस पथक धडकले; पण… – hookah parlours in holkarwadi haveli pune owner and other four person...

हायलाइट्स:हॉटेलच्या नावाखाली सुरू होते हुक्का पार्लरपोलिसांना माहिती मिळताच धडक कारवाईमालकासह पाच कर्मचाऱ्यांना केली अटकहुक्का ओढणारे गेले पळून म. टा. प्रतिनिधी, हडपसर: ग्रामीण...

Recent Comments