Home शहरं औरंगाबाद Aurangabad Corona Update: २५ हजारांवर नागरिकांची करोनावर मात - aurangabad corona update...

Aurangabad Corona Update: २५ हजारांवर नागरिकांची करोनावर मात – aurangabad corona update : 25000 cured from coronavirus in aurangabad


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात आतापर्यंत २५ हजार ६८५ नागरिकांनी करोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. सध्या ५६२ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. करोनाबाधितांमध्ये १८ ते ५० वर्षे या वयोगटातील व्यक्तींची संख्या १५ हजार ४८९ इतकी आहे.

औरंगाबाद शहरात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखीनच कमी झाली. महापालिकेने करोना संसर्ग झालेल्या रुग्णांसंदर्भात अहवाल तयार केला आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार औरंगाबाद शहरात १८ ते ५० वर्षे वयोगटातील करोनाबाधितांची संख्या १५ हजार ४८९ इतकी आहे. ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील करोनाबाधितांची संख्या सात हजार ६५७ इतकी आहे. पाच ते १८ वर्षे वयोगटातील करोनाबाधितांची संख्या तीन हजार ३७१ इतकी असून, शून्य ते पाच या वयोगटातील ५३७ जण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार आतापर्यंत औरंगाबाद शहरात २७ हजार ५४ व्यक्तींना करोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी २५ हजार ६८५ नागरिक करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या ५६२ व्यक्तींवर विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे. करोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत महापालिका हद्दीतील ८०७ जणांचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती धुरा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड प्रभावित राज्यांतून महाराष्ट्रात हवाई आणि रेल्वेमार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे असून, संसर्ग नसलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेशास...

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

Recent Comments