Home महाराष्ट्र Aurangabad farmer: मनाची श्रीमंती! शेतकऱ्यानं पोलिसांना मोफत दिली ५ टन मोसंबी -...

Aurangabad farmer: मनाची श्रीमंती! शेतकऱ्यानं पोलिसांना मोफत दिली ५ टन मोसंबी – 5 ton sweet lime mosambi provided to police by aurangabad farmer


अहमदनगर: करोनाच्या संकटामुळं अनेक जणांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकरीही यातून वाचलेला नाही. स्वतः संकटात असताना, आपणही समाजाचं काही देणं लागतो या जाणीवेतून औरंगाबादमधील शेतकऱ्यानं मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकत मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे. करोनाशी लढणाऱ्या पोलिसांसाठी त्यानं तब्बल ५ टन मोसंबी स्वखर्चानं पोहोच केली आहे.

करोनासारख्या अदृश्य शत्रूविरोधातील लढ्यात जीवाची पर्वा न करता आपले पोलीस कर्मचारी उतरले आहेत. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भरउन्हात रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांसाठी काहीतरी करावं, असं औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगाव येथील शेतकरी मुरलीधर चौधरी यांना वाटलं. चौधरी यांची बारा एकरावर मोसंबी बाग आहे. प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या फळाला बाजारात सध्या मोठी मागणी आहे. सध्या बाजारात ६० ते ७० रुपये किलो दरानं मोसंबी विकली जात आहे. मात्र, हीच मोसंबी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांना देण्याचा विचार चौधरी यांनी केला. त्यांचे काही महाविद्यालयीन मित्र पोलीस खात्यात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. नगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र पाटील आणि चौधरी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर चौधरी यांनी आपल्या बागेतील तब्बल अडीच टन मोसंबी नगर पोलिसांसाठी स्वखर्चानं पोहोचवली. नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या १ हजार पोलिसांना ती देण्यात आली. नगरचे अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते या मोसंबीचे वाटप करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रांजल सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. इतकंच नाही तर चौधरी यांनी लातूर पोलिसांना अडीच टन मोसंबी स्वखर्चाने पाठवून दिली. त्यांच्या या मदतकार्याचं कौतुक होत आहे.

माझी मोसंबीची मोठी बाग आहे. माझे अनेक मित्र पोलीस खात्यात नोकरीला आहेत. अधिकारी व कर्मचारी संकटकाळात अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून मी स्वखर्चाने मोसंबी पुरविली आहे.

– मुरलीधर चौधरी, मोसंबी उत्पादक शेतकरी

राज्य आर्थिक कोंडीत; नगरमध्ये १२०० ग्रामसेवक पगाराविना

आम्ही पुन्हा येऊ; गावाकडे परतताना परप्रांतीय झाले भावूकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments