Home शहरं औरंगाबाद aurangabad graduate constituency: मराठवाड्याच्या समस्यांची चव्हाण यांना जाण - aurangabad graduate constituency...

aurangabad graduate constituency: मराठवाड्याच्या समस्यांची चव्हाण यांना जाण – aurangabad graduate constituency candidate satish chavan is aware of the problems of marathwada says maharashtra minister dhanjay munde


म. टा. प्रतिनिधी, परभणी

मराठवाड्याचे प्रश्न विधीमंडळात मांडण्याचे काम करणाऱ्यात सतीश चव्हाण आघाडीवर असतात. विभागातील समस्यांची जाण असणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहतात. पदवीधर निवडणुकीत त्यांना मतदार पाठबळ देतील, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार चव्हाण यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात शनिवारी मेळावा झाला. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, आमदार अमोल मिटकरी, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार विक्रम काळे, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, महापौर अनिता सोनकांबळे, हरिभाऊ शेळके, माजी महापौर प्रताप देशमुख, सभापती भावना नखाते, अनिल नखाते, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब जामकर, डॉ. उल्हास उढाण आदी उपस्थित होते. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपवर टीका केली. ‘मी ज्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्या पक्षात माझ्यासारख्या नेत्यांना किंमत नाही. काम नाही तसेच मान पण नाही. महाविकास आघाडीत माणसांना किंमत आहे. त्यामुळेच माझ्यासारखे नेते इकडे येण्याच्या मार्गावर आहेत,’ असे गायकवाड म्हणाले.

अॅड. स्वराजसिंह परिहार यांनी प्रास्ताविक केले. रणजित काकडे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. जयंत बोबडे यांनी आभार मानले.

आज नांदेड दौरा

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रविवारी नांदेड जिल्हा दौरा आहे. सकाळी श्यामसुंदर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देतील. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेतील आणि सहविचार सभांना उपस्थित राहणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

india pakistan news: India Slams Pakistan For Presenting Dossier Of Lies At Un – Pakistan Terrorism पाकिस्तानने अबोटाबाद लक्षात ठेवावे; भारताने सुनावले

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना पाकिस्तानात असल्याचे निक्षून सांगून 'पाकिस्तानच्या अबोटाबादमध्येच जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून...

ajit pawar: मुख्यमंत्रिपदाचा योग कधी? अजित पवार म्हणाले… – what ajit pawar said on the question regarding cm post

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकारांच्या एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरं जावं लागलं. अर्थात, अजित पवार...

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Recent Comments