Home शहरं औरंगाबाद aurangabad News : अतिसंवेदनशील भागांची संख्या पोचली वीसवर - the number of...

aurangabad News : अतिसंवेदनशील भागांची संख्या पोचली वीसवर – the number of hypersensitive parts reached twenty


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात करोना विषाणू संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. दररोज ‘करोना पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंता देखील वाढू लागली आहे. त्याचबरोबर शहरातील अतिसंवेदनशील भागांची संख्याही वाढू लागली आहे. ही संख्या आता १३वरून २०वर गेली आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने या सगळ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे बाधित वसाहतींची संख्या देखील वाढू लागली आहे. करोनाबाधित रुग्ण सापडलेल्या वसाहती संवेदनशील, अतिसंवेदनशील वसाहती म्हणून गणल्या जात आहेत. त्या वसाहतींना पूर्णपणे ‘सील’ करून प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जात आहे. रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे महापालिका प्रशासनाने सगळ्याच वसाहती अतिसंवेदनशील वसाहती म्हणून गृहित धरून तेथे आवश्यक ती उपाययोजना सुरू केली आहे.

Bअतिसंवेधनशील वसाहतीB

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार अतिसंवेदनशिल वसाहती पुढील प्रमाणे आहेत. कंसामध्ये या वसाहतीत आढळलेले करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे.

नूरकॉलनी (३८), किलेअर्क पंचकुवा (२९), समतानगर (दहा), हिलाल कॉलनी (पाच), आसेफिया कॉलनी (२७), संजयनगर – मुकुंदवाडी (५९), जयभीमनगर (३०), भीमनगर भावसिंगपुरा (सात), निजामगंज कॉलनी रोशनगेट (सात), बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन (सहा), कैलासनगर (चार), बिस्मिल्ला कॉलनी (दोन), पुंडलिकनगर (एक), गारखेडा गुरुदत्तनगर (एक), चेलिपुरा (एक), पैठणगेट (पाच), नूतनकॉलनी – बडातकिया (एक), शहानगर (एक), चिकलठाणा (एक), बीड बायपास स्कायसिटी (एक), विजयश्री कॉलनी सिडको एन-पाच (एक), हिनानगर (एक), नंदनवन कॉलनी (एक).Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Recent Comments