Home शहरं औरंगाबाद aurangabad News : अपरात्री पाणीपुरवठा; एकाचा चावला साप - night water supply;...

aurangabad News : अपरात्री पाणीपुरवठा; एकाचा चावला साप – night water supply; one bitten snake


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे काही भागात रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, रात्री बारा वाजता पाणी भरताना सिडको एन चारमध्ये एकाला साप चावला.

वादळी वारा, पाऊस यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सांभाळताना पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळीअवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांनाही त्रास होत आहे. पाणीपुरवठा दिवसाच करावा, अशी मागणी शहर परिवर्तन आघाडीचे राहुल इंगळे यांनी महापालिकेकडे वारंवार केली आहे. परंतु, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. दोन दिवसांपूर्वी सिडको एन चार मधील वॉर्ड क्रमांक ७८च्या ए सेक्टरमधील आशिष पालकर यांना रात्री बाराच्या सुमारास पाणी भरताना साप चावला. साप चावल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना घाम फुटला, त्यांनी तातडीने एमआयटी हॉस्पिटल गाठले. उपचाराच्या दरम्यान तो साप बिनविषारी असल्याचे लक्षात आल्याने पालकर यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

Recent Comments