Home शहरं औरंगाबाद aurangabad News: इफ्तार खरेदीसाठी तोबा गर्दी - toba crowd for iftar shopping

aurangabad News: इफ्तार खरेदीसाठी तोबा गर्दी – toba crowd for iftar shopping


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bरमजानच्या इफ्तारी खरेदीसाठी विविध भागात शनिवारी मुस्लीम बांधवांनी तोबा गर्दी केली. प्रशासनाने ही गर्दी होऊ नये म्हणून शहरात ठिकठिकाणी बाजार भरविण्याचे नियोजन केले होते. मात्र, हे नियोजनच फसल्याने आमखास, शहागंजसह अन्य बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी झाली.

रमजानचा पहिला रोजा शनिवारपासून सुरू झाला. रोजा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने विविध भागातील मोकळ्या मैदानावर इफ्तार बाजार भरविणार असल्याचे जाहीर केले. याबाबत काही व्यापाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, अनेक ठिकाणी गाड्या कुठे उभ्या कराव्यात याची माहिती देण्यात आली नाही. आमखास मैदानात सुरक्षित वावर नियमानुसार प्रत्येक दुकानदारांना जागा करून देण्यात आली. मात्र, दुकान किंवा हातगाड्या उभी करण्यासाठी बाजार सुरू होण्याच्या वेळेपूर्वी यावे लागत आहे. गरज पडल्यास मालही मागवावा लागत आहे. काही ठिकाणी प्रशासनाचे लोक सहकार्य करित आहेत. तर काही ठिकाणी नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हे बाजार भरलेच नाहीत. शेवटी लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली.

Bयेथे भरणार होता बाजार

Bआमखास मैदान, आरेफ कॉलनी मैदान, गिरणी (जिनिंग मिल) मैदान, अल्तमश कॉलनी मनपा खुली जागा, हर्सूल जेल समोरील मैदान, मोतीवाला शाळा मैदान, न्यू. एस. टी. कॉलनी मनपा खुली जागा, शहागंज बसस्थानक, दिल्लीगेट पेट्रोल पंप समोरील खुली जागा, रोजबाग ईदगाह मैदान, पैठण गेट सर्कल, मोईनुल उलूम शाळेचे मैदान, सिल्कमिल कॉलनी, नारेगाव मनपा शाळेचे मैदान, मिसारवाडी, जाधववाडी मंडी, चिकलठाणा आठवडी बाजार, कारगिल मैदान, शहानूरमिया दर्गा मैदान-डी-मार्ट-जबिंदा लॉन्स, छावणी आठवडी बाजार, पानचक्की येथील मनपाची खुली जागा, अनिसा विनर शाळेचे मैदान, विमानतळाजवळील वाहन बाजार, खासगेट-जिन्सी पोलिस स्टेशन समोरील मोकळी जागा, रविवार बाजार, जालीवाली दर्गा किराडपुरा, रहेमानिया कॉलनी-इलियास मशीद मागील जागा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments